Home कथाभयकथा नवीन फ्लॅट

नवीन फ्लॅट

by Patiljee
572 views

नवीन जॉब असल्यामुळे आम्ही नवीन फ्लॅट भाड्याने घेण्याचे ठरवले म्हणून एका नवीन सोसायटी मध्ये राहायला जायचं ठरवलं. तसही आम्ही लग्न झाल्यापासून भाड्यानेच राहतोय. पण आताची सोसायटी मस्त मोठी होती महिन्याचा भाडा ही कमी होता वातावरण एकदम शांत, आजूबाजूला झाड पण होती त्यामुळे हवेत छान गारवा होता. सोसायटी खूप मोठी होती आमचा पाचवा फ्लोअर होता पण संपूर्ण रिकामा. आजूबाजूला कोणीच राहत नव्हत मी सचिनला बोलले म्हणजे माझ्या नवऱ्याला की, काय ओ इथे कोणीच राहत नाही आपण एकटेच कसे राहायचे मला भीती वाटे. अग घाबरतेस काय मी आहे ना. चल समान लावायला सुरुवात कर.

असे बोलून सचिनने दरवाजा लावला आणि आम्ही सामान लावायला सुरुवात केली. मी पहिला किचनचा ताबा घेतला आणि सचिन हॉलमध्ये सगळ्या वस्तू लावत होता. इतक्यात आमच्या दारावर टक टक असा आवाज आला. मी लगेच हॉल मध्ये आले सचिन ही माझ्याकडे बघत होता थोडी भीती वाटली कारण आम्ही नवीनच या सोसायटीमध्ये राहायला आलोत मग आता कोण आले असेल? मी म्हटलं सचिनला नको उघडू दरवाजा पण तो न घाबरणारा होता माझं ऐकतोय कुठे त्याने जाऊन दरवाजा उघडला. पण आजूबाजूला कोणीच नव्हते पुढे पहिले जिन्यात सुद्धा पाहिले कोणीच नव्हते.

एक थंड हवेची झुळूक समोरून आली थोड बर वाटलं गर्मीने नको झालं होत. पण इतकी थंड हवा कशी काय ते ही या मे महिन्याच्या उकाड्यात मी सचिन ला प्रश्न केला? पण त्याचे नेहमीचेच उत्तर काही नाही चल आपण आवरून घेऊ आणि दरवाजा लाऊन घेतला. किचनमधे भांडी लावत असताना माझ्या मनात तेच विचार इथ कोणी आजूबाजूला कोणीच राहत नाही कसं होणार भीती वाटतेय खूप. पण याचे सचिनला काहीच वाटत नाही तो काय दिवसभर ऑफिसमध्ये मलाच एकटीला घरात राहायचं आहे रूम बघायला ही आणले नव्हते याने डायरेक्ट शिफ्टींग केली.

सर्व भांडी लावून झाली इतक्यात पुन्हा दरवाजावर टकटक झाली. आता माझ्या छातीत धड धड करायला लागले, घसा कोरडा पडला पण सचिनने न घाबरता लगेच दरवाजा उघडायला गेला पाहतो तर काय समोर वॉचमन उभा होता, तो म्हणाला साहेब आपली गाडी मध्येच उभी केलीत ती आतमधे घ्या असे सांगून तो निघून गेला. आज बाहेरूनच जेवण मागवले कधी एकदा रात्री झोपतो असे झाले रात्री इतके दमलो होतो दोघे पण कधी सकाळ झाली ते कळलेच नाही. नाष्टा केला आणि सचिन कामावर निघून गेला, आता मात्र मला करमनार नव्हते. दरवाजा लावला आणि टीव्ही चालू केला.

रिमोटची बटण दाबत होते कुठच चांगला प्रोग्राम लागला नव्हता. अचानक दरवाजावर टकटक आवाज आला आणि त्याचबरोबर माझ्या पोटात भीतीने गोळा आला. आता कोण असेल? कारण इथे तर कोणीच राहत नाही सतत चार ते पाच वेळा आवाज आल्यावर मी दरवाजा उघडला तसा एकदम थंड हवेचा झोत मला स्पर्शून गेला. समोर बघते तर एक तरुणी म्हणजे लग्न झालेली स्त्री होती ती, दिसायला एकदम सुंदर, सडपातळ बांधा चेहरा गोल आणि रेखीव, गोरी गोरी पान केसात मस्त गुलाबाचे फुल खोचलेले समोर आल्यावर तिने एक स्माईल दिले, मी ही हसले पण तुम्ही कोण असे विचारल्यावर ती म्हणाली अहो ताई आम्ही ह्याच फ्लोअरला राहतो ती बघा समोरची रूम आमचीच, मला आश्चर्य वाटले कारण ह्या फ्लोअर वर तर कोणीच राहत नाही मी तसे तिला म्हणून दाखवले ही पण ती म्हणाली अहो ताई आम्ही इथेच राहतो पण कधी तरी येतो ही रूम आमचीच पण आम्ही गावाला राहायचो. ती ती बघा कोपऱ्यात आहे ना ती रूम आमची. या ना घरात बसा ती आली बसली मी विचारलं चहा घेणार तर नको बोलली.

ताई तुमचे मिस्टर कुठे आहेत? ते कामाला गेलेत सकाळी लवकर जातात आणि रात्री उशिरा येतात तिने सांगितले. तिचे डोळे मला जरा विचित्र वाटत होते म्हणजे कधी हिरवे तर कधी निळे पण मी इग्नोर केले वाटले मला भास होत असेल. का कुणास ठाऊक ती घरात आल्यापासून वातावरणात थंडावा जाणवत होता. शिवाय एक कुजकट वासही येत होता. विचार केला नवीन रूम मधे आलोत तर येत असेल वास. नंतर विचारले मी चहा घेणार का तुम्ही थांबा मी चहा ठेवते मी किचन मधे गेले आणि काहीतरी तरी आठवले म्हणून बाहेर आले तर ती बाई गायब… लगेच कुठे गेली घरी गेली म्हणून मी त्यांच्या रूम कडे पाहिले पण कोणीच नाही मग दरवाजा लावून घेतला.

पण ती बाई गेल्यावर कुबट वास ही गेला. जाऊदे आपल्याला काय करायचं म्हणून टीव्ही चालू केला. आणि समोरच्या सोफ्यावर लक्ष गेले अरे तिचा मोबाईल इथेच राहिला वाटे. मोबाईल हातात घेऊन पहिला पण हातात घेताच एक वेगळाच स्पर्श जाणवला. अंग थोड थरथरायला लागले. अचानक घसा कोरडा पडला ती लगेच किचन मध्ये गेली आणि घटा घटा दोन तांबे पाणी प्यायली. आणि समोर खिडकीतून कित्तेक तास बाहेर पाहत होती.

संध्याकाळ झाली सचिन आला दरवाजाची बेल वाजवली पण प्रीया काही दरवाजा उघडेना म्हणून मग अखेर सचिनने चावी लावून दरवाजा उघडला. प्रिया म्हणून हाक मारली पण प्रिया आवाज देत नव्हती. त्याला घाबरल्यासारखे झाले तो बेडरूम मधे गेला तिथे प्रिया अंगावर घेऊन झोपली होती. तिला दरदरून ताप आला होता सचिनने लगेच तिला हॉस्पिटल मध्ये नेले.

थोड्या वेळात तिला बरे वाटले आणि सचिनने तिला घरी आणले. रात्र झाली होती घरातील वातावरण शांतच होत पण थोड भयभीत वाटत होत सगळं इग्नोर करत सचिनने प्रियाला बेड वर झोपवले. बरं वाटते का आता? सचिन ने विचारले तशी प्रिया म्हणाली नाही अंग थोड जड झालेय. अचानक तिची नजर टेबलावर ठेवलेल्या मोबाइल कडे गेली आणि तीच अंग थरथर कापायला लागलं, अंग आगीत टाकल्या सारखे जळत होते, ती जोरजोरात किंचाळत होती. सचिनला यावर काय करावे कळत नव्हते. तो तिला विचारात होता पण प्रिया काहीच बोलत नव्हती ती फक्त कीचाळत होती. काही वेळाने ती शांत झाली तशीच शांत पणे झोपली.

सचिनला मात्र झोप लागत नव्हती एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवरून तो सतत कुस बदलत होता. अचानक त्याच लक्ष प्रियाच्या चेहऱ्यावर गेले तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. ती जोरजोरात श्वास घेत होती विचित्र काहीतरी पुटपुटत होती. सचिन कान लाऊन ते ऐकत होता. नीटसं काही ऐकायला येत नव्हतं सचिन ने तिला हळवल आणि तिचे लालभडक डोळे बघून त्याला धक्काच बसला. तिने सचिन कडे बघत दात विचकले आणि एका झटक्यात सचिनचा गळा पकडला. सचिनला पहिले तर काहीच कळले नाही. त्याने पाहिले तर प्रियाचा चेहराच इतका भयानक दिसत होता की तो देखील घाबरला होता.

त्याने खूप जोर लावून गळा सोडला आणि धावत बेडरूमच्या बाहेर गेला बाहेरून कडी लावून घेतली. आतून गुर्गुरण्याचा आवाज येतच होता. सकाळ होईपर्यंत वाट बघत होता. बाहेर पक्षांच्या आवाजाने सचिनला जाग आली, सकाळ झाली त्याने फोन हातात घेतला. ऑफिसला फोन करून सांगितले आज मी येणार नाही. कट करून लगेच आईला फोन लावला. हॅलो आई अग मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे, मला तुझी गरज आहे ग, आणि सगळा रात्रीचा प्रकार त्याने आईला सांगितला.

त्याने हळूच जाऊन बेडरूमचा दरवाजा उघडला प्रिया बेडवर शांत झोपली होती. सचिनने तिला हळवल. तिने पटकन डोळे उघडले हळुवारपणे उठून जागेवर बसली. म्हणाली डोकं थोड जड झाले रे, सचिनने हळुवार डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला थांब मी तुला आल्याचा चहा घेऊन येतो बरं वाटेल. चहा बनवून प्रियाला दिला इतक्यात दारावरची बेल वाजली म्हणून सचिनने दरवाजा उघडला आई तू? आणि हे कोण आहेत तु आत चल सगळं सांगते.

चहा घेऊन झाल्यानंतर आई म्हणाली ऐक सचिन हे आपल्या गावाच्या शेजारील गावात राहतात यांना असल्या गोष्टींबद्दल सगळी माहिती आहे. हे महंत आहेत त्यांना तू सगळं सांग आतापर्यंत जे जे घडले आहे ते. पण आई मला यातील काहीच माहीत नाही हे सगळं प्रियाच सांगू शकेल. प्रियाने आतापर्यंत घडलेला सर्व प्रकार सांगितला. आई, महंत आणि मी तिघेही बाहेर आलो हॉल मधे बसून त्याच विषयावर चर्चा करत होतो. इतक्यात बेडरूम मध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. आई आणि मी घाबरलो तिघेही धावत बेडरूम कडे गेले.

प्रिया बेडवर नव्हतीच सगळे घाबरले बेडरूम मध्ये सगळीकडे पाहून झाले कुठेच नाही तसा प्रियाचा जोरजोरात हसण्याचा आवाज आला. पण आवाज खूप विचित्र आणि घोगरा होता. आवाज वरून येत होता सर्वांनी वरती पाहिले आणि आमची छाती धड धड करू लागली आमचे प्राणच कंठाशी आले. प्रिया वरती छताला चिकटून होती, तीच हसन फार विचित्र होत, दात काळे दिसत होते शिवाय तोंडातून लाल गळत होती चेहरा ही विचित्र जळल्यासारखा दिसत होता. शिवाय घान वास येत होता इतक्यात ती बोलू लागली या माणसाला आणलेत तुम्हाला काय वाटले याच्या मदतीने तुम्ही माझी प्रिया पासून सुटका करून घ्याल, शक्य नाही ते अजिबात शक्य नाही. प्रियाला आता मीच नेणार माझ्या सोबत आणि ते ही लवकरच बोलता बोलता ती सरपटत खाली आली. हे सगळं इतकं भयानक होत की सगळे डोळे फाडून बघत होते. सगळेच थंडी भरल्यासारखे थरथरत होते. इतक्यात महंतांनी त्याच्याकडे असणारी पूड हातात घेऊन मंत्र म्हटले आणि फुंकर मारून प्रियावर उडवले तशी प्रिय धाडकन खाली कोसळली. सर्वांनी तिला उचलून बेडवर ठेवले.

महंत म्हणाले आपल्याला हे सगळं उद्याच्या उद्याच करायला लागेल. उद्या अमावस्या आहे आणि ही बाई तिला नेल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जवळच आसपास तिची जागा आहे तिथं जाऊन आपल्याला हा विधी करायला लागेल ते ही आमावशेच्या रात्री. त्या घराची चावी घेऊन ठेवा पुढे काय होईल त्यासाठी मनात चिकाटी ठेवा, हिम्मत ठेवा आणि देवाचे नाव तोंडावर असू द्या. मी येतोच थोड्या वेळात जाऊन इथे माझे ओळखीचे युवक आहेत त्यांच्या कडून थोड सामान घेऊन येतो.

एक तासात महंत हजर त्यांच्या पिशवीत काही पुड्या होत्या कुंकू, अबीर आणि गुलाल तसेच उदबत्त्या, होमाचे समान अजून बरेच समान होते. आम्ही ते पाहिले आणि रात्रीचे जेवण केले. जेवण धड कोणाला जात नव्हते. तसेच दोन घास खाल्ले. उद्याची अमावशा विचार करूनच शरीरात भीतीने रक्ताचा प्रवाह जोरात वाहत होता. महंत सांगत होते काहीही होणार नाही पण तरी प्रियाच्या बाजूला झोपताना माझा मन घाबरत होत, काय करावे उद्या काय होईल या विचारात मग्न असताना मला झोप लागली.

झोपेतच सचिनला वाटले आपला पाय कोणीतरी चावत आहे त्याला खूप त्रास होतात उठून पाहतोय तर प्रिया पिंजाटलेल्या केसात डोळे लाल भडक झालेले, काळे दात माझा पाय खायला सुरुवात केली होती बोटाचा थोडा तुकडा तिने टचकन मोडला आणि कळ पायातून मेंदूत गेली मी जिवाच्या आकांताने एकच किंकाळी फोडली हे बघून प्रिया हसत होती. माझा आवाज ऐकून महंत आणि आई धावत आले. महंतांनी त्यांच्याकडे असणाऱ्या बाटलीतील मंतरलेले पाणी त्यांनी प्रिया वर शिंतडले तसे तिच्या शरीरावर जळल्यासारखे डाग दिसायला लागले काही वेळातच ती किंचाळत शांत झाली.

सकाळ झाली आता सगळेजण संध्याकाळची वाट पाहत होते. यावेळी प्रियाला खुर्चीत बांधून ठेवले होते. पण मध्ये मध्ये ती किंचाळत होती ओरडत होती. सचिनला इमोशनल ब्लॅक मेल करत होती. पण महंतांनी सांगितले होते तिच्या बोलण्याला बळी पडू नका ती वाईट शक्ती आहे. तुमची प्रिया नाही हे लक्षात ठेवा. आता रात्र झाली रात्रीचे दहा वाजले होते त्या बाईची ती रूम खोलण्यात आली. उघडल्यावर कुबट, घाणेरडा वास तिघांच्या नाकाला झिणझिण्या आल्या. महंत म्हणाले मला या घरात नकारात्मक शक्तीचा खूप मोठा सहवास जाणवतो आहे. आपणच आपली काळजी घ्या. मी समर्थ आहे माझी काळजी घ्यायला पण तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या दिलेल्या मंत्राचा जप करत रहा. कुठेही कसला आवाज आला तरीही दुर्लक्ष करा. ती वाईट शक्ती आहे हे लक्षात घ्या.

त्या घरात हॉलच्या मध्यभागी महंतांनी एक वर्तुळाकार रांगोळी आखली त्यात एक अग्निकुंड तयार केलं त्याच्या भोवती हळदी, कुंकू टाकले काही रेषा आखल्या. सात ते आठ अगरबत्ती घेतल्या त्या पेटवल्या संपूर्ण घरभर त्या फिरवल्या. आता थोड बरं वाटलं कारण त्या घरात येणार दर्प कमी झाला होता. आता हळू हळू घड्याळाचा काटा 12 वर आला तसा वातावरणातील दाब वाढत होता अगरबत्तीचा वास ही त्या वासा पुढे कमी झाला इतका घाणेरडा वास येत होता अचानक जोरजोरात गुर्गुरण्याचा आवाज येऊ लागला. तसे सगळे घाबरले.

आम्ही नामस्मरण करतच होतो आणि महंतांनी आमच्या कपलावर सुरक्षा तिलक लावले होते पण तरीही मनात प्रचंड भीती होती. अचानक घरातील प्रत्येक वस्तू जोरजोरात हळू लागली पडदे, दार, शो च्या वस्तू अगदी सगळच हलत होत, काही वस्तू जागेवरून पडल्या तर काही हवेत उडत होत्या. थोड्या वेळात वातावरण शांत झालं आणि समोरच दृष्य बघून अंगात भीतीचा गोळा आला समोर प्रिया होती ही कशी काय आली कारण हिला तर बांधून ठेवले होते.

तरीही महंतांनी सांगितल्या प्रमाणे आम्ही जागेवरच खिळून होतो. महंत मंत्र म्हणत होते त्यांनी पेटवलेली अग्नी कुंडात काही आणलेले पदार्थ तर कधी एक द्रव्य टाकत होते. तशी तशी प्रिया आणखी चवतालत होती. तिचे विव्हळणे त्रासदायक वाटत होते पण तरीही आम्ही काहीच करू शकत नव्हतो. मधेच ती मला हाक मारायची दया यायची, पण महंत एकच कटाक्ष टाकायचे मग आमच्या मनात असूनही पुढे जायचो नाही.

“कोण आहेस तू” आणि का त्या पोरीला त्रास देतेस काय बिघडले आहे तिने तुझे? मी कोण आहे याच्याशी तुला काय करायचे आहे थेरड्या, नाही सांगणार अजिबात नाही.. असे म्हणत जोरजोरात हसत होती, मध्येच गुरगुरत होती. तसे महंत मंत्र म्हणत हातात मंतरलेले पाणी, आणि विभूती घेतली तिच्यावर टाकली तशा तिच्या अंगाची दाही झाली. असे दोन ते तीन वेळा केल्यावर ती बोलू लागली हम्ममममम माझ्या नवऱ्याच बाहेर लफड चालू होत मी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला तीच आवडायची, खूप त्रासले होते त्याच्या रोजच्या त्रासाला कधी मारायचा घान शिव्या द्यायचा याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला पेटून घेतले.

पण पहिल्यांदा या फ्लोअरला कुणीतरी राहायला आले आणि तिने माझा मोबाईल हातात घेतला त्याच्यामुळेच मी तिच्यात प्रवेश केला बर वाटत होते इतक्या वर्षांनी त्या रूमच्या बाहेरील जगात म्हणून आता मी हिला सोडणार नाही हा हा हा असे म्हणत खिदळत होती. मग आता तुला काय पाहिजे सोडून जा त्या शरीराला अजून त्रास नको देऊस तिने तुझे काहीच बिघडवले नाही. नाही मी नाही सोडून जाणार अजिबात नाही जाणार, तिच्या चेहऱ्यावरील राग दिसून येत होता. तसा मीच तिच्यापुढे हात जोडून उभा राहिलो म्हणालो “ताई मी तुमच्या नवऱ्याला शोधून त्याच्यावर योग्य ती शिक्षा व्हावी याची हमी तुम्हाला देतो. तेव्हा ती थोडी शांत झाली तिच्या चेहऱ्यावरील समाधान दिसत होते. वातावरण ही आता निर्मळ झाले होते. हळू हळू ती अदृश्य झाली सगळं कसं शांत झालं होत.

तिचा आणलेला मोबाईल त्या अग्निकुंड मध्ये टाकलं तशी एक किंकाळी कानावर आली. प्रिया आता ठीक वाटत होती. तिला घेऊन आमच्या घरात नेली. दुसऱ्या दिवशी आम्ही ती रूम सोडली पण तिच्या नवऱ्याला शिक्षा देण्याचे काम चालू आहे पण अजून तो आम्हाला सापडला नाहीये.

समाप्त

लेखक : महेंद्र पाटील (पाटीलजी) आवरे उरण, रायगड

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल