Home करमणूक प्रविण लाड यांचे पैंजण सॉंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

प्रविण लाड यांचे पैंजण सॉंग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

by Patiljee
690 views

पावसाच्या या रोमँटिक वातावरणामध्ये ” अरविंद इंटरटेनमेंट व बंधन प्रोडक्शन ” प्रस्तुत ‘ पैंजण ‘ हे सॉंग लगेच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमेय जोशी दिग्दर्शित व प्रदीप भोई यांनी गाण्याला स्टोरी दिलेली असून अक्षय राजपूत यांनी साँगची कोरिओग्राफी केलेली आहे. संपूर्ण गाण्याचे चित्रीकरण बंधन प्रोडक्शन ( योगेश ठाकूर ) यांनी केलेले आहे. ड्रोन पायलट घनश्याम यांनी ही छान चित्रीकरण केले.

सोबतच ” केसावर फुगे फेम अण्णा सुरवाडे ” यांचे गीत,संगीत व गायन असून पहिल्यांदाच ते रोमॅण्टिक गाण्यांमधून आपली छाप संपूर्ण महाराष्ट्र मध्ये टाकत आहेत, रजनी पवार यांनी ही गाण्यात गायले आहे. सोबतच ” वावर हाय तर पावर हाय ” फेम ‘ प्रवीण लाड ‘ हे या गाण्यांमधून एक रोमँटिक लूकमध्ये मुख्य नायकाच्या भूमिकेत आपल्यासमोर छोट्या पडद्यावर आणि यूट्यूब वर पुन्हा एकदा दिसणार आहेत.

सोबतच मुख्य नायिका ‘ माही नागमोती ‘ यांनीही पैंजण या गाण्यातून पदार्पण केले असून मिलिंद मोरे जेष्ठ कलाकार, त्यांनी सुद्धा या गाण्यात काम केलेले आहे. प्रवीण लाड यांनी ” मेरे भोले आणि आये गणपती बाप्पा ” या सुपरहिट डेवोशनल सॉंग नंतर पहिलच रोमँटिक सॉंग करण्याचा प्रयत्न केला आहे. गाण्याचे चित्रीकरण हे खान्देश मधील रायपुर, पाल आणि पद्मालय येथे संपूर्ण झालं.

तीन दिवसाच्या या चित्रीकरणात त्यांनी अप्रतिम दृश्य आणि एक छान अशी कहाणी या रोमँटिक साँग मधून दाखावण्याच्या प्रयत्न करणार आहे, पाऊस सतत सुरू असल्यामुळे चित्रीकरणात अडथळे आले पण टीम आणि मेहनतीने अश्या वातावरणात तीन वेगवेगळ्या लोकेशन्स वर त्यांनी या चित्रीकरणाला पूर्ण केले.

लवकरच पैंजण हे रोमँटिक साँग प्रेक्षकांसमोर येणार असून त्या आधी पोस्टर व टीझर रिलीज होणार आहे. सोबतच या गाण्याला घेऊन प्रेक्षकांमध्ये ही फार उत्साह दिसून येत आहे.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल