भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशात अनेक क्षेत्रात क्वारंटीन सेंटर उभारण्यात आली आहेत. रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी अशा सेंटरची उभारणी केली जात आहे. पण अशा सेंटरमध्ये सुद्धा बेडची कमतरता भासत आहे. अनेक लोक समोर येऊन मोठ्या मनाने गोष्टी दान करत आहेत. अशीच एक बातमी वसई मधून समोर आली आहे. एका नव विवाहित जोडप्याने क्वारंटीन सेंटर साठी ५० बेड दान केले आहेत.
एरिक आणि मर्लिन अशा ह्या पती पत्नीचे नाव आहे. अनेक नव विवाहित जोडपी आपल्या लग्नात लोकांना मजेशीर कार्यक्रम, खान पाण्याची व्यवस्था करतात. पण एरिक आणि मर्लिन ह्यांनी सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. महाराष्ट्रात सीआरपीसीची धारा १४४ लागू आहे. म्हणजेच लग्नात ५० लोकांच्या अधिक लोकांचा समावेश नसावा. आणि आलेल्या वऱ्हाडी लोकांनी सोशल डीस्टांसिंगचे पालन करणे गरजचे आहे. असा सरकारचा आदेश आहे.
म्हणूनच एरिक आणि मर्लिन ह्यांनी आपल्या लग्नात खूप कमी लोकांना बोलावून अत्यंत साध्या पद्धतीत लग्न लावले. राहिलेल्या पैशातून त्यांनी ५० बेड खरेदी करून क्वारंटीन सेंटरला दान केले. त्यांच्या ह्या कार्याचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. सर्वांनी समोर येऊन खुल्या हाताने मदत करावी अशी महाराष्ट्र सरकारने आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ह्यांनी सुद्धा विनवणी केली आहे.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता काही दिवसात अनेक रुग्णाची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण वेळीच त्याची दखल घेऊन स्वतः ची काळजी घेतली पाहिजे.