Home करमणूक देखणे रूप पाहून कोणीही घायाळ होईल असं आहे या अभिनेत्रींचे तारुण्यातील सौंदर्य

देखणे रूप पाहून कोणीही घायाळ होईल असं आहे या अभिनेत्रींचे तारुण्यातील सौंदर्य

by patiljee
28 views

आपण ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत तीच नाव आहे श्रुती मराठे ही एक मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री असूनही तिने तमिळ मधील सिनेमातून ही काम केले आहे. दिसायला अत्यंत सुंदर अशी ही अभिनेत्री तिने चित्रपटांवर काही सीरियल मध्येही काम केले आहे. तिचा जन्म गुजरात मधील वडोदरा येथे झाला. त्यानंतर तीच कुटुंब पुण्यात राहण्यासाठी आले. दहावी संपत आल्यावर तिला अभिनय करण्याची संधी चालून आली आणि पेशवाई या मालिकेत तिने आपला पहिला अभिनय केला. तमिळ चित्रपट नान अवन इल्लै २ चांगलाच गाजला.

एक मादक अभिनेत्री म्हणून तमिळ चित्रपटांमध्ये प्रवेश करणाऱ्या श्रुतीकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या.
जशी वयात आली तिथपासून आपण अभिनेत्री व्हायचे हेच तिचे स्वप्न होते. त्याचबरोबर तिने 2008 मध्ये आपला पहिला मराठी सिनेमा सनई चौघडे दिला. या चित्रपटाने तिला खूप प्रसिद्धी दिली पण प्रेक्षकांनाही हा सिनेमा खूप आवडला होता. त्यानंतर तिला राधा ही बावरी या मराठी सीरियल मध्ये काम करायची संधी मिळाली. या सीरियल मधून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली त्यानंतर तुझी माझी हा तिचा मराठी सिनेमा आला.

त्यातील अभिनेता गौरव घाटनेकर याच्यासोबत तिचे प्रेम प्रकरण सुरू झाले. त्यानंतर 4 डिसेंबर 2016 ला या दोघांनी लग्न केले तिने आतापर्यंत 20 चित्रपटाने काम केले आहे. त्यात काही हिंदी तर काही तमिळ आणि कन्नड असे चित्रपट आहेतं. मराठीतील सिनेमा रमा माधव यातही ती आपल्याला दिसली होती. श्रुती मराठे ढोल ताशा वाजवण्यामधे अग्रेसर आहे.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: Content is protected !!