Home कथा Ex गर्लफ्रेंड सोबत डेट भाग ०२

Ex गर्लफ्रेंड सोबत डेट भाग ०२

by patiljee
2118 views

ठीक चाललं आहे ना मग चांगलं आहे. पण ऐक ना ह्या चार वर्षात खरंच मी तुला खूप मिस केले. अनेकवेळा वाटले तुला कॉल करावा पण मग तुझं आणि सोनाली चे प्रेमप्रकरण समोर यायचं. अग पण ऐक तर माझे.. थांब थांब अमर काहीही बोलू नकोस आधी आज मला बोलून मोकळे होऊदे. तुझ्या आणि सोनाली बद्दल खरंच मी चुकले. माझीच मैत्रीण रश्मी तिने मला काही एक भरवून सांगितले आणि मी तिच्या शब्दाला हो हो करत गेले. खरं काय ते तिने मला मागच्याच वर्षी सांगितले पण तेव्हा खरंच मला असे वाटले वेळ निघून गेली असेल. म्हणून तुला मेसेज केला नाही.

पण खरं सांगू अमर असा एकही दिवस गेला नाही जेव्हा मी रोज सकाळी तुझ्या गुड मॉर्निंग आशू आणि तो स्माईली ईमोजीची वाट पाहिली नाही. खरंच त्या गोष्टी मी मनातून खूप मिस करत होते. कधी आरशात समोर उभी राहिली तर नेहमी मागून तुझा आवाजाचा भास व्हायचा की “रानी साहेब काय झक्कास दिसताय आज तुम्ही” तुला आठवते आपण पहिल्यांदा पिरवाडी उरण बीचवर भेटलो होतो. किती धो धो पाऊस पडत होता. तरीसुद्धा तू मला बाईकवर बसवून घेऊन गेला होतास. आजूबाजूला कितीतरी प्रेम युगुल बसले होते.

मी तर पार घाबरून गेली होती कारण पहिल्यांदा असे काही घरच्यांना न सांगून बाहेर पडले होते. त्यात आपण केलेला तो पहिला स्मुच. ५ मिनिटे ७ सेकंद..खरंच खूप घाबरले होते मी तेव्हा पण तेव्हाही मला धीर दिला होतास. म्हणाला होतास घाबरु नकोस आशू तुला कधीच एकटे सोडणार नाही, मी आहे तुझ्या सोबत. तुझ्या त्या शब्दांनी मी खरंच खूप शांत झाले होते. त्यानंतर तू माझ्यावर खूप प्रेम केलेस, हवी तेवढी मोकळीक दिलीस, कधीच कुणा मुळासोबत बोललो तरी तुला वाईट वाटत नव्हतं. उलट तूच संगायचास मित्र बनव. पण मी मात्र काय केले कुणी मला काहीही सांगितले आणि मी ते ऐकुन त्याच्यावर विश्वास ठेवला. खरंच किती वाईट वागळे मी तुझ्याशी. कधीतरी माफ करशील का रे मला?

आशू तू माझ्यावर चिडलीस ह्या गोष्टीचे वाईट मला वाटलेच नव्हते. पण तू ब्रेकअप केल्यावर पुढचे चार महिने मी तुला रोज कॉल मेसेज करायचो पण तू कधीच माझी बाजू ऐकूनच घेतली नाहीस. इथेच तू चुकीची वागलीस. आधी तुझा खूप राग आला मग विचार केला मी जिच्यावर एवढे मनापासून प्रेम केले तिला मी कसा आहे हे नीट ओळखता सुद्धा आले नाही ती मला आयुष्यभर साथ काय देणार? पण असो तू नेहमी म्हणायचीस ना की तू वेळ पाळत नाहीस? चांगले कपडे घालत नाहीस, नीटनेटका राहत नाहीस, कधी वेळेवर सेवींग करत नाहीस? चल मग आज माझ्याकडे पाहा. तुला एक सुद्धा गोष्ट मला नाव ठेवण्यास मिळणार नाही. तू गेल्यावर मी ह्या गोष्टी आत्मसात करून घेतल्या आहेत.

बस रे अमर खरंच सॉरी ना रे, खूप सॉरी. माहीत आहे माझी खूप मोठी चुकी झाली आहे पण आपण पुन्हा सोबत आलो तर मी ह्या चुका सुधारू शकते. अमर थोडा हसतच म्हणाला माझ्या आयुष्यात तू होतीस ना तेव्हा मला कुणाची गरज नव्हती म्हणून कधीच स्वतःकडे लक्ष देत नव्हतो, कारण मस्त छान नटून थटून मला कोणत्याच मुलीला इंप्रेस करायचे नव्हते. मी तुझ्याच जगात खूप खुश होतो. तू आयुष्यात होतीस तेव्हा कधीच आरशासमोर उभा सुद्धा राहत नव्हतो पण आता मात्र मी स्वतःला खूप बदललं आहे. राहिला प्रश्न आपण एकत्र येण्याचा तर ते आता शक्यच नाहीये.

माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी एक मुलगी पाहिली आहे. पुढच्याच महिन्यात साखरपुडा आहे. खूप चांगली आहे मला समजून घेते. आणि हो तुझ्या आणि माझ्या बद्दल मी तीला आधीच खरं खरं सांगून टाकलं आहे तिला काहीच समस्या नाहीये. तुला आज भेटायला आलो कारण मला सुद्धा तुला एकदा समोर भेटून बोलायचे होतं.

अमर पुढे काहीच न बोलता तिथून निघून गेला. आशा मात्र तिथेच बसून रडू लागली.

लेखक : पाटीलजी
(आवरे- उरण)

समाप्त

© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधिन आहेत. लेखकाच्या नावासहित ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही.

Please follow and like us:

Related Articles

1 comment

Ex गर्लफ्रेंड सोबत डेट भाग ०१ - Readkatha May 25, 2020 - 12:47 pm

[…] कथेचा दुसरा भाग इथे वाचा […]

Reply

Leave a Comment

Shares
error: Content is protected !!