हॅलो कसा आहेस? कोण बोलतेय? ह्म्म्म.. आवाजावरून सुद्धा ओळखलं नाहीस? आवाजावरून नाही ओळखले पण हा दीर्घ श्वास घेऊन तुझ्या त्या ह्म्म्म मुळे नक्की ओळखलं. बोल काय बोलतेस? काही नाही रे सहज वाटले कॉल करावासा म्हणून कॉल केला? जवळजवळ चार वर्ष झाली असतील ना आपण न बोलल्याला? चार वर्ष तीन आठवडे पाच दिवस आणि सहा तास, असो ते महत्त्वाचे नाहीये आशा तू बोल आज एवढ्या वर्षांनी कशी आठवण काढलीस?
म्हटलं ना असे काही कारण नाहीये की का कॉल केला आहे पण वाटलं आज कॉल करावं. त्यात योगायोग म्हणजे उद्या आपल्या नात्याला सात वर्ष पूर्ण होत आहेत. म्हटलं तुला विचारावं की उद्या भेटू शकतोस का? तुला आठवतेय आशा जेव्हा तू माझ्यासोबत ब्रेकअप करून निघून गेली होतीस, मला किती आणि काय काय बोलली होतीस? जी चूक मी केली सुद्धा नव्हती त्याची शिक्षा मी गेली चार वर्ष भोगतो आहे. कधीतरी वाटले करावा कॉल आणि मन मोकळे करावे पण नाही तुम्ही तर शपथ घालून ठेवली होती मला कॉल करशील तर माझे मेलेले तोंड पाहशील म्हणून गप्प होतो.
अरे हो हो अमर माहीत आहे माझी चुकी तेव्हा झाली होती. पण तेव्हा समोर अशा काही गोष्टी घडत गेल्या होत्या की मला त्या पाहून तुझ्यावर संशय निर्माण झाला होता. असो उद्या भेटशील का आपल्या नेहमीच्या जागेवर? (अमरला सुद्धा भेटायची ईच्छा तर खूप होती म्हणून त्याने होकार दर्शवला) जेव्हा ते दोघे प्रेमात होते तेव्हा अमर बेरोजगार होता आणि आशा कॉलेज करत होती. पण आताची परिस्थिती वेगळी होती.
ठरलेल्या वेळेत अमर जाऊन त्यांच्या नेहमीच्या कॅफेत जाऊन बसला. काही वेळातच त्याला समोरून आशा येताना दिसली. सुंदर गुबगुबीत दिसणारी आशा आता मात्र बारीक झाली होती. तिचे गाल तो नेहमीच प्रत्येक वेळी भेटल्यावर ओढायचा पण ह्यावेळी मात्र तर गाल पूर्णतः आतमध्ये गेले होते. एकतर तिने डाएट केले असणार किंवा घरची जबाबदारी स्वतःवर घेऊन स्वतःकडे बघणे सोडून दिले असणार? नेहमी त्याला भेटायला येताना ती छान नटून सजून यायची पण आज मात्र परिस्थिती खूपच वेगळी होती. ती फक्त चेहऱ्याला पावडर लावून आली होती. ना काजळ, ना लिपस्टिक, ना फाऊंडेशन, काहीच नाही.
हे पाहून त्याला नवळ वाटलं खरं पण त्याने त्यावेळी काहीच न म्हणता तिला शेजारील खुर्चीवर बसण्याचा अबोल सुर लावला. बोल अमर काय घेणार तू? नेहमीची आपली कॉफी मागवायची का? नाही कॉफी नको मला, आता नाही कॉफी घेत मी? जिच्यासाठी घ्यायचो तीच आयुष्यात नाहीये मग कॉफिला सुद्धा आयुष्यातून काढून टाकलं. (पुढील दोन मिनिटे दोघात भयाण शांतता पसरली) शेवटी न राहून तिनेच विचारलं? काय रे आजवर आपल्या अनेक भेटी झाल्या पण नेहमीच तू उशिरा यायचास मग आज माझ्याही आधी कसा काय पोहोचला?
कसे आहे आशा जी ह्या चार वर्षात खूप गोष्टी मी शिकलो आहे. त्याचबरोबर मी आयुष्यात काय काय चुका केल्या आहेत त्याचा अभ्यास सुद्धा केला आहे. म्हणून आज वेळेवर आलो खर तर हे आधीच करायला हवं होतं पण ठीक आहे. अरे वा म्हणजे अमर साहेब वेळ पाळायला लागले तर आम्ही तर बोलून बोलून थकलो पण ठीक आहे देर आये दुरुस्त आये. बाकी काय जॉब कुठे करतो आहेस आता? करतोय ना की अजूनही.. तिचे वाक्य अर्धवट तोडत त्याने म्हटले तू गेल्यानंतर एक जॉबच अशी गोष्ट होती ज्यामुळे स्वतःला सावरू शकलो. एमआयडीसी मध्ये एका कंपनी मध्ये काम करतोय. पगारही चांगला आहे. चाललेय सर्व ठीक.
लेखक : पाटीलजी
(आवरे- उरण)
© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधिन आहेत. लेखकाच्या नावासहित ही पोस्ट शेअर करायला हरकत नाही.
2 comments
[…] […]
[…] Ex गर्लफ्रेंड सोबत डेट […]