बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये स्टार किड्स ह्यांचा दबदबा नेहमीच पाहायला मिळतो. आपल्या आई वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात पदार्पण करून आपला एक वेगळा ठसा उमटवतात. पद्मिनी कोल्हापुरीच्या बाबतीत आपण सगळेच जाणून आहोत कारण ती तिच्या कालखंडात बॉलिवुड सिनेमात खूप प्रसिद्ध होती त्याचबरोबर तिने खूपच छान अशा सिनेमात कामे केली होती. जे सिनेमे आजही लोकांना आवडतात. अशाच पद्मिनी कोल्हापुरीच्या मुलाबाबत आज आपण बोलणार आहोत.
अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी बाबत आपण सर्वच जाणून आहोत पण तुम्हाला हे माहित आहे का की तिचा मुलगा प्रियांक शर्मा याच्याबद्दल. प्रियांक शर्मा बद्दल कमी लोकांना माहिती आहे हा एक अक्टर आहे आणि तो लवकरच सब कुशल मंगल या सिनेमाद्वारे बॉलीवुड मध्ये डेब्यू कारणार आहे आणि म्हणून आज आम्ही तुम्हाला प्रियांक शर्मा यांचे काही फोटो दाखवणार आहोत.

सब कुशल मंगल ह्या सिनेमात प्रियांक शर्मा याच्यासोबत भोजपुरी आणि इतर भाषिक सिनेमात आपल्या अभिनयाने अनेकांच्या हृदयातील ताईत असलेले रवी किशन ह्यांची मुलगी रेवा किशन सुद्धा अभिनयाच्या क्षेत्रात आपले पाऊल ठेवणार आहे. अक्षय खन्ना देखील ह्या सिनेमात तुम्हाला मुख्य भूमिकेत दिसेल. ह्या सिनेमाचे दिग्दर्शन करन विश्वनाथ कश्यप यांनी केले आहे आणि लवकर हा सिनेमा तुमच्या आमच्या भेटीला येणार आहे.