Home संग्रह पैठणी साडीच्या बाबतीत ह्या गोष्टी खरंच तुम्हाला माहीत नसतील, मशिनद्वारे बनवलेली पैठणी कशी ओळखावी

पैठणी साडीच्या बाबतीत ह्या गोष्टी खरंच तुम्हाला माहीत नसतील, मशिनद्वारे बनवलेली पैठणी कशी ओळखावी

by Patiljee
705 views

येवल्यात तयार होणारी पैठणीला साड्यांची महाराणी म्हणतात. तर आज आपण पैठणी या साडी बद्दल सांगणार आहोत. खर तर सर्वच स्त्रियांची मनापासून इच्छा असते की आपण पैठणी नेसावी पण या साडीची किंमत पाहून कित्येकांना ही साडी मनात असून सुद्धा घेणे परवडत नाही. सुंदर सोनेरी काठ, पदरावरती मोर आणि पोपट ह्यांची सुंदर नक्षी अशी रंगसंगती कोणाला भुरळ नाही घालणार? म्हणून ज्या महिलांनी पैठणी घेतली आहे किंवा ज्यांना घ्यायची आहे त्यांना ही माहिती असणे गरजेचे आहे.

Source Google

पैठणी कशी ओळखायची
पैठणी दोन प्रकारे बनवतात. एक असते हाताने बनवलेली आणि दुसरी मशिनी द्वारे बनवलेली. आता हाताने बनवलेली पैठणी ही ओरिजनल असते तर मशीन द्वारे बनवलेली पैठणी ही तशी जरा हलकी असते. आता हे तुम्ही कसे ओळखाल? तर मशीन द्वारे बनवलेली पैठणी हीची मागची बाजू पहिली तर जी जरीची डिझाईन असते ती मागून कापलेली असते ती हाताने सहज निघू शकते पण ओरिजनल पैठणीची जर किंवा किनार ही तुम्हाला दोन्ही बाजूने सारखीच दिसेल. इथे कोणत्याही प्रकारे धागा कापला जात नाही दोन्ही बाजूने ही पैठणीची डिझाईन तुम्हाला सारखीच दिसेल असेच असते. तुम्ही मशीन द्वारे बनवलेली पैठणी पहिली तर मागून पदरावर काढलेली मोर पोपट कमळ अशा डिझाईन ह्या यांचे धागे हे ओपन दिसतात.

पण ओरिजनल पैठणीमध्ये हेच धागे पदरच्या दोन्ही बाजूला समान दिसतील. कुठेही धागा कापलेला दिसणार नाही. अजुन एक म्हणजे ओरिजनल पैठणीला साडी सारखाच ब्लाऊज असतो तर मशिनद्वारे बनवलेल्या पैठणी मध्ये कोंट्रास कलरचा ब्लाऊज असतो. त्याचप्रमाणे ओरिजनल पैठणी ही चुरगळली असतात लगेच व्यवस्थित होते पण मशिनद्वारे केलेली पैठणीच्या बाबतीत तसे होत नाही. सगळ्यात महाग पैठणीची किंमत 1 लाख 95 हजार इतकी आहे ही साडी तयार व्हायला जवळ जवळ नऊ महिने लागतात. त्याचप्रमाणे या पैठणीला देशातच नाही तर परदेशात सुध्दा मागणी आहे.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल