जास्त करून स्त्रियांचे हात या प्रकारे आपल्याला झालेले दिसतात कारण दिवसभर त्याच पाण्यात हात घालत असतात. कधी जेवण बनवताना, कपडे धुताना, भांडी घासताना तर कधी अन्य साफसफाई करताना त्यांचे हात सतत पाण्यात असतात. त्यामुळे त्यांना हा त्रास नेहमीच होत असतो. पण का तुम्हाला माहीत आहे अशा वेळी आपल्या हाताची बोटे का संकुचित पावतात नाही ना मग जाणून घेऊया आज ह्याबद्दल आपण.
तुम्ही जेव्हा जास्त वेळ हात पाण्यात घालता तेव्हा आपला हात बाहेर काढल्यावर त्याची अवस्था वेगळीच होते. म्हणजे एखाद्या म्हाताऱ्या माणसाच्या शरीरा सारखे आपले हात झालेले दिसतात. पण हे ही तुमच्या लक्षात असते की काही नाही काही वेळाने हात पुन्हा जसेच्या तसे व्यवस्थित होतात.
असे म्हणतात की पाण्यात जास्त काळ हात ठेवल्यास आपल्या हाताच्या त्वचेच्या थरावर पाणी साचले जाते आणि म्हणून आपली बोटे सुजल्यासारखी दिसतात. डॉक्टर सांगतात की ही एक न्यूरल प्रक्रिया आहे पाण्यात हात ठेवल्याने आपले हात आतून संकुचित पावतात आणि हातात असणाऱ्या नसा ह्या संकुचित पावतात त्यामुळे आपल्या हातात रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही त्यामुळे हातांची स्थिती अशी होते.
तुम्हीही ही गोष्ट स्वतः हून अनुभवली आहे का? पहिल्यांदा तुमच्यासोबत असे झाले होते तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती ती आम्हाला नक्कीच कळवा.