छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तरी आपल्या ओठी आले किंवा ऐकू आले तरी अंगात एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा संचारते. राजं आपल्यासाठी देव आहेत आणि ह्याच राजांबद्दल जेव्हा काही गोष्टी कानावर पडतात तेव्हा अजुन छान वाटतं. आज आम्ही अशीच एक बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ती वाचून तुम्हालाही त्या इसमाचा गर्व वाटेल आणि आपण शिवरायांचे लेकरं आहोत म्हणून अभिमानही वाटेल. चला तर मग जास्त वेळ न दडवता वाचूया.

बेल्जियम मधून एक युवक पीटर व्हॅन गेट महाराष्ट्रात येतो आणि इथल्या संस्कृतीच्या प्रेमात पार बुडून जातो. इथला इतिहास वाचताना त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाचन केले आणि तो त्यांचा जणू भक्तच झाला. राजांनी जिंकलेले किल्ले तेथील वास्तू आत्ता कशा असतील हे पाहण्याची त्याला इच्छा झाली. म्हणूनच ह्या पठ्याने अवघ्या ६० दिवसात म्हणजेच दोन महिन्यात शिवरायांचे २०० गडकिल्ल्यांना भेटी दिल्या आणि सर्व गड पालथून काढले. खरंच ही आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण भारतात येऊन त्यांनी फक्त राजाचा इतिहास पालथून काढण्याचा निर्णय घेतला.
त्याने आपल्या प्रवासात ट्रान्स रूट एक मध्ये लोणावळा ते नाणेघाट, ट्रान्स रूट दोनमध्ये नाणेघाट ते भंडारदरा, तिसऱ्या ट्रान्स रूट मध्ये लोणावळा ते माथेरान, चौथ्या ट्रान्स रूट मध्ये पुणे ते महाबळेश्वर, पाचव्या रुटमध्ये नाशिक ये अजंठा असा प्रवास केला. ह्या त्याच्या मोहिमेचे नाव त्याने मिशन ट्रान्स सह्याद्री असे दिले होते.

पीटर हा चेन्नई मध्ये असलेल्या एक्सप्लोर डिस्कवर प्रेझर्व ह्या चेन्नई ट्रेकिंग क्लबचा सभासद सुद्धा आहे.ह्या क्लब मार्फत त्यांनी भारतातल्या अनेक कानाकोपऱ्यातील छोट्या छोट्या गावांना वेगवेगळ्या प्रकारची मदत सुद्धा केली आहे. रोजच्या आहारातील जीवनावश्यक वस्तू सुद्धा त्यांनी ह्या गावांना पुरवल्या आहेत. ज्या भागात पूर झाले तिथे जाऊन त्या लोकांना पुनर्वसन करण्यासाठी मदत केली. खराब झालेली घरे, शाळा आणि अनाथाश्रम पुनर्संचयित केली. ह्याच मार्फत पुलिकॅटमध्ये मुलांसाठी शिकवणी सुद्धा चालू केली आहे.
बेल्जियम मधील युवक भारतात येऊन इथल्या जनतेसाठी तो एवढे करतोय म्हटल्यावर नक्कीच आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. तुम्ही त्यासाठी कमेंट मध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा.