Home करमणूक Pooja Sawant हिचे प्राण्यांवर असणारे जीवापाड प्रेम पाहून तुम्हालाही नवल वाटेल

Pooja Sawant हिचे प्राण्यांवर असणारे जीवापाड प्रेम पाहून तुम्हालाही नवल वाटेल

by Patiljee
555 views
Pooja Sawant animal Love

साधा चेहरा पण तितकाच दिसायला तेजस्वी अशी पूजा सावंत, तिला महाराष्ट्रातील सर्वात आकर्षक चेहरा म्हणून किताब मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाला हे तिला अजूनही स्वप्नं वत वाटत आहे. महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन हे टायटल जेव्हा तिने जिंकले तेव्हा तिच्यामध्ये आपल्या कलेला लोकांपर्यंत नेण्याची ओढ लागली. तिथूनच तिने कळा क्षेत्रात प्रवेश केला. बुगी उगी, एकापेक्षा एक, जल्लोष यांसारख्या लोकप्रिय शो मध्ये ती आपल्याला दिसली. त्यानंतर तिचा पाहिला चित्रपट आला तो म्हणजे क्षणभर विश्रांती.

ह्यानंतर तिला आता ग बया, झकास, सतरंगी रे, पोस्टर बॉय, निळकंठ मास्टर, दगडी चाळ, वृंदावन, चिटर त्यानंतर २०१० मध्ये तिला हिंदी चित्रपट मिळाला त्याचे नाव होते तुम मिलो तो सही, यात तिची अगदी छोटी भूमिका होती. त्यानंतर हिंदी मध्ये तिला मोठा ब्रेक जंगली सिनेमात मिळाला. ह्या सिनेमात अभिनेता विद्युत सोबत ती आपल्याला दिसली होती.

अशोक सराफ यांची हातातली अंगठी त्यांच्यासाठी का लकी आहे नक्की जाणून घ्या

Pooja Sawant मराठी फिल्म इंडस्ट्री बद्दल नेहमीच ऋणी आहे. कारण या फिल्म इंडस्ट्रीने तिला भरपूर काही दिले आहे. तिथल्या कलाकारांनी प्रत्येक वेळी तिला प्रोत्साहन दिले आहे. २५ जानेवारी १९९० साली तिचा जन्म झाला आहे. लहान असल्यापासूनच तिला नृत्याची खूप आवड होती. तिला अभिनयाचा वारसा मिळाला आहे तो तिच्या वडिलांकडून, त्यांच्या वडिलांनी आपली तीस वर्ष रंग भूमिका समर्पित केली आहेत.

पण तरीही म्हणतात ना प्रत्येक माणसाच्या इच्छा आकांक्षा खूप वेगळ्या असतात आणि त्याच्या नशिबात वेगळे वळण येतात. पूजा हिला ही अभिनय मध्ये करीयर करायचा नव्हता तर तिची इच्छा होती प्राण्यांचा डॉक्टर होण्याची. कारण तिला पहिल्यापासून प्राणी आणि पक्षी यांच्यात खूप जास्त रस आहे. लहानपणापासूनच पक्षी आणि प्राण्यांमध्ये खेळणे तिला खूप आवडते. आणि म्हणून जेव्हा कधी तिच्याकडे वेळ असतो शुटींग नसते तो वेळ ती प्राण्यांसोबत घालवते. सगळ्या प्राण्यांसाठी एक स्वतंत्र शेल्टर उभारावे अशी तिची इच्छा आहे.

सध्या पूजा सावंत अनेक मराठी सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त असणार आहे पण लॉक डाऊन मुळे ह्या सिनेमाचे चित्रीकरण थांबवले आहे. पण लवकरच ती आपल्या मोठ्या पडद्यावर दिसेल.

हे पण वाचा मेरा नाम जोकर मधील ही अभिनेत्री बघा सध्या काय करत आहे

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल