Home कथा प्रणय आणि गर्भनिरोधक गोळ्या

प्रणय आणि गर्भनिरोधक गोळ्या

by Patiljee
18674 views
गर्भनिरोधक गोळ्या

कुछ यादे हसीन होती है तो कुछ परेशान करती है. ये वक्त वक्त की बात है. आठवणींना जेवढा आपण दुजोरा देऊ तेवढ्याच त्या आपल्याला त्रास देतात. हेच काहीसे माझ्या बाबतीत घडत आहे. आमच्या आयुष्यात आम्ही अशा काही चुका केल्या आहेत की आयुष्यभर रडण्याशिवाय काहीच करू शकत नाही. मी आणि ती ह्या परिस्थितीतून कसे जातोय हे आम्हालाच माहीत.

ती म्हणजे परी, माझी परी. आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये पीजी म्हणून राहत होतो. ती तिच्या दोन मैत्रिणी सोबत तर मी माझा मित्र नितेश सोबत राहत होतो. येताना जाताना आमची भेट व्हायची, कधी नजरेला नजर तर कधी स्मित हसू हे आमचे नेहमीचे समीकरण बनले होते. एकमेकांशी न बोलताही आम्ही खूप काही बोलून जायचो.

काही करून मला तिच्याशी बोलायचे होते पण सुरुवात कुठून करू? हेच कळत नव्हतं. पण आज संधी चालून आली होती. सोसायटीच्या लिफ्टमध्ये आम्ही आज दोघेच होतो. ती पुढे आणि मी मागे उभा होतो. लिफ्ट वर जात होती आणि मी मनात तिच्याशी काय बोलावं म्हणून शब्दांची जुळवा जुळव करत होतो.

मी काही म्हणणार एवढ्याच तिनेच विषय काढला, कसं चाललेय जॉब? मी फक्त चांगला म्हणून मान हलवली. पण तिनेच स्वतःहून हात समोर करत म्हटलं मी परी, तसं पाहायला गेलो तर आपल्याला ओळखीची गरज नाही पण तरीही सुरुवात कुठून तरी व्हावी म्हणून ही फॉर्मालिटी. तिचे हे वागणं मला थोड वेगळं तर वाटलं पण चांगलही वाटलं.

तिच्याशी बोलल्यावर मला कळलं की तिने आताच एम बी ए (फायनान्स) पूर्ण केले आहे आणि जॉबच्या शोधात आहे. हे ऐकल्यावर मी लगेच तिला आमच्या ऑफिसमध्ये असलेल्या जॉब बद्दल सांगितले. आमच्या दोघांचे एकत्र येणे कदाचित देवाच्याही मनात असेल म्हणून तिला आमच्याच ऑफिस मध्ये नोकरी मिळाली. मग काय सोबत ऑफिसला जाणं, सोबत लंच करणं, एकत्र घरी येणं हा दिनक्रम सुरू झाला.

आमचे नातं मैत्री पलिकडे कधी गेले हे आम्हाला सुद्धा कळलं नाही. ते व्यक्त करण्याची आम्हा दोघांना सुद्धा गरज भासली नाही. कारण आमचे नातं खरं होतं. ह्या आमच्या प्रवासात दोन वर्ष कधी उलटुन गेली कळलं सुद्धा नाही. आम्ही आता सोबत राहू लागलो. लग्न न करताही नवरा बायकोचे आयुष्य जगू लागलो. पण इथूनच आमच्या नात्याला गालबोट लागलं. नको असलेली बंधने आम्ही तोडली आणि मग नको ते होऊन बसलं.

परीला दिवस गेले, पण आम्ही स्वमर्जीने गोळ्यांच्या सहाय्याने त्या बाळाला जगात न येताच आम्ही मारून टाकलं होतं. आम्ही तारुण्यात होतो कदाचित म्हणून ह्या गोष्टीचा आमच्या दैनंदिन आयुष्यावर काहीच परिणाम झाला नाही. ऑफिस, मुवी, फिरणे, रात्री प्रणय आणि झोप असे आमचे दिनक्रम चालूच राहिले. पण इथेच आम्ही चुकलो. पुढील दोन वर्षात आमचा प्रणय आणि गोळ्या घेणे चालूच राहिले.

कालांतराने आम्ही लग्न केलं. गुण्या गोविंदाने संसार सुरू केला. दोघेही खूप जास्त खुश होतो. कारण पहिलं प्रेमच जोडीदार होणे हे सर्वांच्याच नशिबात येत नाही. पण आमची खरी कसोटी तर पुढे होती. जेव्हा आम्हाला वाटले आता आम्ही आई बाबा बनण्यासाठी योग्य आहोत तेव्हा आम्ही प्रयत्न सुरू केले. पण काही केल्या फरक येत नव्हता. शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या आम्ही तयार नाही का असे राहून राहून वाटत होते.

डॉक्टर कडे जाऊन चेक अप केले आणि सर्व गोष्टी समोर आल्यानंतर डोक्याला हात लाऊन बसलो. परीने वारंवार ह्या आधी गर्भ निरोधक गोळ्या खाळ्या आणि त्याचाच परिणाम तिच्या पिंडावर झाला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ती कधीच आई होऊ शकत नव्हती. ह्याच चुकी आमची दोघांचीही होती. कुणा एकाला दोष देऊन काहीएक होणार नव्हतं.

म्हणून आम्ही दत्तक बाळ घेण्यासाठी आता प्रयत्न करत आहोत. ही प्रोसेस वाटते तेवढी सोपी नाहीये पण आम्ही त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जे जे मित्र मैत्रिणीं आमची ही कथा वाचत आहेत त्यांना एकच गोष्ट सांगेल. क्षणिक सुखासाठी असे काही करून बसू नका की आयुष्यभर पच्छाताप करावा लागेल.

ह्या पण माझ्या काही निवडक कथा वाचा

समाप्त

कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल