Home कथा प्रेमाचा त्रिकोण

प्रेमाचा त्रिकोण

by patiljee
21 views

सुजित आणि सुधीर लहानपणापासूनचे मित्र अगदी जीवाला जीव देणारे. संपूर्ण गावात त्यांच्या मैत्रीचे उदाहरण दिले जात असे. कुणी एकटा जरी गावात फिरताना दिसला तरी मित्र कुठे आहे रे? असे अनेक माणसे विचारायची. बालवाडी पासून ते बारावी पर्यंत दोघांनीही सोबत शिक्षण घेतले. आताच बारावीची परीक्षा देऊन दोघेही मस्त सुट्ट्या एन्जॉय करत होते.

सुध्या यार आपण पास झालो ना दोघेही तर आपण तालुक्याच्या कॉलेजमध्ये दाखला घेऊ. तुला काय वाटते? सुजित सर तुम्ही जसे म्हणाल तसे. आम्ही काय आपल्या शब्दाबाहेर आहोत का? (दोघेही हसू लागतात). अरे ती सोनम काय बोलली सुध्या हो की नाही? नाही रे कसलं काय? जेव्हापासून तिला कळलं आहे की मी तिच्या मागे आहे तेव्हापासून ती भाव सुद्धा देत नाही. पहिली छान बोलायची पण माझ्या मनातले तिला सांगून मी माती खाली. नकार दिला यार तिने आपल्याला. गेली तीन वर्ष तिच्यामागे आहे तुलातर माहितीच आहे. खूप प्रेम करतो रे तिच्यावर.

हो रे सुधीर माहीत आहे मला. माझ्या घराच्या दोन घर सोडून राहते ना ती? आज जाताना विचारतो नक्की काय आहे तिच्या मनात? सुजित यार तुला माझ्या मनातले लगेच कळते ना यार? तू अपना जिगरी हैं.

दोघेही घरची वाट पकडतात. सुजित जाताना सोनमला आवाज देतो. सोनम आहेस का घरात? सुजितला पाहून सोनम खूप जास्त खुश होते. काय राव आज स्वारी आमच्या घरी कशी आली तुमची? अग जरा बोलायचे आहे माझ्या घरी येतेस का? अरे बोल की मग इथेच आप्पा शेतात गेलेत आणि आई टेरेसवर पापड लाटत बसली आहे. आपल्याला वेळच वेळ आहे बोल. अग तुला तर माहीत आहे सुधीर तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मग तू त्याला नकार का दिलास? तीन वर्ष तो तुझ्या मागे आहे माहीत आहेत ना तुला? अरे सुजित आता काय आणि कशी सांगू? खरतर कसे बोलावे कळत नाही पण सांगते ऐक.

अगदी आपण आठवी मध्ये असल्यापासून सोबत आहोत तिघेही? त्यामुळे मला सुधीर बद्दल कधीच असे प्रेम भावना नाही वाटली. खर सांगू तर मी तुझ्या प्रेमात आहे. अगदी आपल्या आठवी इयत्तेच्या सहामाई परीक्षेपासून. पण मला कधी तुला सांगणे जमले नाही. इच्छा तर खूप होती पण स्वतः तुला विचारले तर तुला असे वाटेल की काय मुलगी आहे ही? मुलाला समोरून प्रपोज करतेय. म्हणून एवढी वर्ष गप्प बसले. पण जेव्हा सुधीरने मला प्रपोज केला तेव्हा मात्र मी पार खचून गेले. मला अपेक्षा होती कधी ना कधी तू मला प्रपोज करशील. पण सुधीरने प्रपोज करून सर्व बिघडवून टाकले. मला तो कधीच आवडला नव्हता. हा मित्र म्हणून तो खूप चांगला आहे पण आयुष्याचा जोडीदार मला तूच हवा होतास.

आता त्याने प्रपोज केलं आणि मी त्याला नकार दिला आणि काही दिवसात मी तुला विचारले आणि तू कदाचित मला हा म्हटला तर तुमच्या मैत्रीत दरी निर्माण होईल. म्हणून मी गप्पच बसले. माझे तुझ्यावर प्रेम आहे पण मला माहित आहे तू त्याच्यासाठी तुमच्या मैत्रीसाठी मला कधीच स्वीकारणार नाही. पण एकदा माझ्या बाजूने पण विचार कर. सुधीर माझ्यावर तीन वर्षांपासून प्रेम करतेय पण मी तुझ्यासोबत लहानाची मोठी झालीय. तुझी प्रत्येक आवड नावड मला माहित आहे. तू समोर असलास की आपोआप चेहऱ्यावर गोड हसू येत. तुझ्यासोबत असले की कसलीच भीती वाटत नाही. हेच तर प्रेम आहे ना सुजित?

आता मात्र सुजित गप्प उभा होता. काहीच न बोलता तो तिथून निघून गेला. जोपर्यत त्याला हे माहीत नव्हतं तोपर्यंत ठीक होतं. पण आता सर्व माहीत आहे म्हटल्यावर त्याला अधिक टेन्शन आलं होतं. सोनम खूप चांगली मुलगी आहे. तिचे वागणे बोलणे नेहमीच त्याला आवडतं आले आहे. पण जर मी तिच्या प्रेमाचा स्वीकार केला तर आमच्या मैत्रीत फूट नक्कीच पडेल. आणि जर मी सोनमला नाही म्हटले तर तिलाही ते खूप वाईट वाटेल. एक वेगळ्याच संभ्रमात तो पडला आहे.

मित्रानो ह्या प्रेमाच्या त्रिकोणात सुजित असा फसला आहे की त्याला बाहेर पडता येत नाहीये. तुम्ही तुमचे मत त्याला नक्की सांगा. त्याने काय करायला हवं? कदाचित त्याला ह्यातून बाहेर पडता येईल.

लेखक : पाटीलजी

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: Content is protected !!