तुला सांगितले ना मला नाही लग्न करायचे तुझ्याशी मग का सारखा वेगवेगळ्या नंबर वरून कॉल करतोस तू? राधा ने रागातच अमोलला म्हटलं. दिवभरातून त्याचा हा तेतीसावा कॉल होता. रोज वेगवेगळ्या नंबर वरून ५० ६० कॉल ठरलेले असतात. त्यामुळे राधा खूप महिने अस्वस्थ होती. त्यांचं चार वर्षाचे प्रेम प्रकरण त्यामुळे सहाजिकच एवढ्या लवकर अमोलला विसरणे कठीण होत. पण त्याचे हे वेड्यागत वागणं, तिला त्रास देणे ह्याला ती फार कंटाळली होती.
त्यांचं ब्रेकअप होऊन आज एक वर्ष पालटून गेलं असेल पण असा एकही दिवस नाही आला जेव्हा अमोलने तिला कॉल केला नसेल. कॉलेजपासून सर्व व्यवस्थित होत. जेव्हा राधा कॉलेजला होती तेव्हा अमोल दीड वर्ष तिच्या मागे होता पण राधा ने त्याला भाव दिला नव्हता. पण जसेजसे दिवस बदलत गेले त्या दोघांनी एकमेकांना लग्नाची वचने सुद्धा दिली. खूप प्रेम करत होते दोघे एकमेकांवर. जणू काही ह्या पृथ्वी तलावर ते दोघेच जीव आहे आणि जगत आहेत अशीच त्यांची समज होती.
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत असंख्य कॉल, मेसेज, व्हिडिओ कॉल असायचे. वेळ मिळेल तेव्हा फिरायला जाणे, सिनेमा पाहणे हे चालूच होते. राधाला चांगले चांगले कपडे आणि तिच्या दैनंदिन आयुष्यातील गोष्टी तो आता तिला देउ लागला होता. तिने बऱ्याचदा नकार दिला कारण तिला एवढ्या महाग वस्तूची सवय नव्हती पण अमोल ने कधी प्रेमाने तर कधी रागाने नेहमीच तिला मोठमोठ्या वस्तू दिल्या आहेत. पाच मिनिट जरी राधाला ऑनलाईन यायला उशीर केला तरी अमोलच्या हृदयाची धडधड वाढायची. खूप प्रेम दोघांचेही एकमेकावर. दोघांच्याही घरात एव्हाना सर्व कळलं होतं. त्यामुळे तो प्रश्न मुळात नव्हताच. पण हे एवढे जिव्हाळ्याचे प्रेम अमोल कडून संशयात निर्माण झाले. राधा भेटायला आली की जरी पाच मिनिटे उशीर झाला तरी त्याची चिडचिड व्हायला सुरुवात झाली.
तिच्या बाबतीत तू खूप जास्त पझेसीव होत चालला होता. चाट करत असताना रिप्लाय द्यायला थोडा तरी उशीर झाला तरी चीड चीड करायचं. कुणाशी बोलतेस?, एवढे लेट रिप्लाय का करतेस?, रिड मेसेज करून सुद्धा रिप्लाय का नाही देत?, असे अनेक प्रश्नाची प्रश्नावली राधा समोर ठेवायचं. त्याच्या ह्या बदलत्या स्वभावाला आता राधा सुद्धा कंटाळली होती. त्याचे म्हणणे फक्त आता एवढेच राहिले होते मी फक्त आणि फक्त माझ्याशीच बोलायचे बस बाकी कुणाशीच बोलायचे नाही. ना तुझ्या मित्रांशी ना मैत्रिणीशी ना कुटुंबातील इतर व्यक्तीशी.
ते दोघं नात्यात तर होते पण अगोदर जो विश्वास एकमेकांवर होता तो विश्वास आता नाहीस होऊ लागला होता. अमोलने इतर मुलीशी बोलले तरी चालते आणि राधा ने जर बोलले मात्र त्याला चालत नव्हते. तरीसुद्धा राधा त्याचे हे सर्व ऐकत होती कारण मनोमनी तिने त्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार मानला होता. त्यामुळे त्याचे वागणे ती मुकाटपणे सहन करत होती. अनेक वेळा त्याने तिला गरज असताना पैस्यांची मदत सुद्धा केली होती. आणि तिने सुद्धा बऱ्याचवेळा अमोलला वेळेला पैसे दिलेच होते.
पण हद्द मात्र तेव्हा झाली जेव्हा एक दिवशी भांडणात अमोल ने तिच्यावर आजवर केलेल्या खर्चाचा हिशोब मागितला आणि मी जेवढे पैसे तुझ्यावर आजवर खर्च केले आहेत ते माझे मला परत कर असे सांगितले. आता मात्र राधाच्या रागाचा बांध फुटला होता. आजवर अनेकवेळा तिने त्याला समजून घेतलं होत. बऱ्याचदा त्याने ब्रेकअप केले होते तेव्हा राधा स्वतः जाऊन समजून काढायची. पण ह्यावेळेस त्याने लिमिट क्रॉस केली होती.
तुझ्या कोणत्याही कुटुंबातील माणसाकडे जायचं नाही, जॉबला जायचं नाही, मित्रांशी बोलायचं नाही, मोबाईल मध्ये फक्त आणि फक्त माझ्याशीच बोलायचे अशा अनेक अटी त्याने तिच्या समोर ठेवल्या होत्या. आता राधाला आपण आयुष्यात केलेल्या सर्वात मोठी घोडचूक लक्षात आली होती. नात्यात असताना सुद्धा अनेक चांगल्या चांगल्या मुलांनी तिला लग्नासाठी विचारलं होतं? पण तिचे मनापासून अमोलवर प्रेम होत म्हणून ती सर्वांना नकार देत होती. पण ह्यावेळी मात्र अमोलने जे केलं होत त्यामुळे तिने स्वतः त्यासोबत ब्रेकअप केलं आणि वेगळी झाली.
ह्या गोष्टीला दीड वर्ष पालटून गेलं आहे पण आजही अमोल तिच्या पाठी आहे. तो अजुनही तिला विसरू शकला नाहीये. रोज दारू पिने, गावात टवाळक्या करणे हेच चालू असते त्याचे. मस्त दिवसभर घरात बसून लाईफ जगत आहे. आजही त्याला असे वाटतं नाही की त्याने जॉबला जावे. तो रोज राधाला फोन करून हेच सांगतो लग्न कर माझ्याशी पण राधा चे सुद्धा म्हणणं आहे की आधी स्वतः च्या पायावर उभा राहा मग मी विचार करेल पण सहा महिने गेले तरी तो अजुनही कोणता व्यवसाय किंवा जॉब करत नाहीये. तू जर माझी नाही झालीस तर मी तुला कुणाची होऊ देणार नाही असे त्याचे स्पष्ट मत आहे. जर तू माझ्याशी लग्न नाही केलेस तर मी तुला खूप काही करू शकतो अशा धमकीही तो देत आहे.
त्यामुळे राधा खूप जास्त डिप्रेशन मध्ये चालली आहे. जगासमोर हसतमुख राहणारी राधा आतून किती खचली आहे ही फक्त ती स्वतः समजू शकते. कारण तिला माहीत आहे अमोल सोबत तिने लग्न केले तर तिचे स्वातंत्र्य पार हिरावून जाईल. घराच्या चार भिंतीतच तिला आपले संपूर्ण आयुष्य काढावे लागेल. पण त्याच्या आणि तिच्या घरचे तिला लग्नासाठी फोर्स करत आहेत. पण अमोल कसा आहे ही तिला चांगलं माहीत आहे मग अशातच स्वतः आगीत उडी कशी मारणार?
मित्रानो तुम्हाला काय वाटतं राधा ने काय निर्णय घ्यावा? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट मध्ये द्या. कदाचित तिला पुढच्या आयुष्याचा निर्णय घ्यायला सोपे होईल.
मी लिहलेल्या ह्या कथा पण वाचा
समाप्त
कथेचे सर्व अधिकार लेखकाधिन आहेत, लेखकाच्या नावासोबत कथा शेअर करायला हरकत नाही.
लेखक : पाटीलजी (आवरे उरण)
15 comments
सांगायचं झालं तर जवळ जवळ माझी पण story अशीच आहे, पण brakup च करण जर वेगळ आहे,
सर्व प्रथम, राधाने हा विचार केला पाहिजे की तिला अमोल सोबत लग्न करायचं आहे की नाही,
करायचं नसेल तर काही झालं तरी अमोलसोबत लग्न करूच नये, मग त्याने काहीही केला तरी, त्याने राधाची माफी मागितली तरी, अमोल स्वतःचा पायावर उभा राहिला तरी, किव्वा त्याने स्वतःचा स्वभावा मध्ये बादल केला तरी, राधाने लग्न करू नये.
आणि जर लग्न करायचंच असेल तर, असा म्हणतात एक स्त्री पुरुषाला जस बिघडवू शकते, तसेच ती पुरषला सुधारऊ सुद्धा शकते,
राधाने त्याला विश्वासात घेऊन, स्वतःचा राग, ego थोडा बाजूला ठेऊन, अमोलची समजूत कडवी, त्याला विश्वास घ्यावा की जशी तुझी मित्र, मैत्रिणी, नातेवाईक आहेत, तसेच ते मला सुद्धा आहे, जसा तू त्यांना वेळ देतो, तसाच मला सुद्धा त्यांना वेळ द्यावा लागणार ना, प्रेम जितक महत्वाचं तेवडीच मैत्री पण महत्वाची ना,
तू स्वतःचा पायावर उभा राहा, मे तुझा सोबत आहे, आशा पद्धतीने तिने त्याची समजूत कडवी,
पण जो काय निर्णय असावा तो 100% clear असावा, तळ्यात मळ्यात नसावा,
शेवटी आयुष्यात फक्त प्रेम असावं,
पैसा आज आहे तर उद्या नाही,
आणि उद्या आहे तर पर्वा नाही,
पैशाने सगल्या गोष्टी विकत घेता येत, पण प्रेम, आपुलकी, भावना या कधीच विकत घेता येत नाही,
आयुष्यात बाकी कोणाची साथ मिळो आगर नको मिळो पण प्रेमाची साथ मिळाली ना तरी आयुष्य खूप सोपं वाटत,
पण या स्टोरी मध्ये अमोलची बाजू माडलीये, अमोल कसा आहे या वर जास्त फोकस केलेला आहे,
राधा काशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे हे मंडलच नही
असा पण होहू शकत की राधा खरोखर चुकीची वागत असेल म्हणून अमोलला तिचा वागण्याचं राग येत असेल,
किव्वा अमोल पहिल्या पासून असाच असेल, पण राधाच्या आता वागण्यात फरक झाला असेल, म्हणून तिला अमोलच्या वागण्यात बादल झाला असे वाटत असेल,
मला असा वाटत दोघांचा बाजू 100% मांडणे गरजेचं होतं.
It’s a pity you don’t have a donate button! I’d most certainly donate to this
fantastic blog! I guess for now i’ll settle for bookmarking and adding your
RSS feed to my Google account. I look forward to fresh updates and
will talk about this site with my Facebook group.
Chat soon!
Everything is very open with a very clear clarification of
the issues. It was truly informative. Your site is extremely helpful.
Many thanks for sharing!
I’ve been browsing online more than 4 hours today, yet I never found any interesting article like yours.
It is pretty worth enough for me. In my opinion, if all site owners and bloggers made good content as you did,
the web will be much more useful than ever before.
This text is invaluable. Where can I find out more?
My brother recommended I may like this website. He was once totally
right. This post actually made my day. You cann’t consider simply how
so much time I had spent for this information! Thank
you!
I always used to read article in news papers but now as I am a user of
internet so from now I am using net for content, thanks to web.
I constantly spent my half an hour to read this webpage’s articles everyday along with a cup of coffee.
Wow that was strange. I just wrote an extremely long comment but after I clicked submit
my comment didn’t show up. Grrrr… well I’m not writing all that over again. Regardless, just
wanted to say excellent blog!
hi!,I like your writing so much! share we be in contact extra approximately your post on AOL?
I require a specialist on this area to resolve my problem.
Maybe that’s you! Looking ahead to look you.
When some one searches for his required thing, thus he/she desires to
be available that in detail, therefore that thing is maintained over here.
There is definately a lot to find out about this topic.
I love all the points you’ve made.
Great goods from you, man. I have understand your stuff previous to and you’re
just too wonderful. I really like what you’ve acquired here,
certainly like what you are saying and the way in which you
say it. You make it entertaining and you still care for to keep it sensible.
I cant wait to read much more from you. This is actually
a wonderful website.
It’s really a cool and useful piece of information. I am satisfied that you simply shared this useful information with
us. Please stay us informed like this. Thanks for sharing.
Thank you, I have just been looking for info approximately this subject for a long time and yours is the best I’ve came upon till now.
However, what in regards to the bottom line? Are you
positive concerning the source?