मी लहान होते तेव्हा आमच्या अंगणात एक रातराणी चे झाड होते. झाड तस बऱ्यापैकी मोठं होत. दिवसभर काही नाही पण एकदा रात्र झाली ही त्यांच्यावरची छोटी छोटी आणि अगणित अशी फुले फुलायची. हो अगणित कारण त्या फुलांची संख्याच इतकी असायची की पाहूनच मन प्रफुल्लित व्हायचं.
पण ती रातराणी फक्त रात्रीच फुलायची म्हणजे रातराणी हा असा झाड आहे की तो फक्त रात्रीच फुलतो आणि त्याच्यावरच्या फुलांचा वास आजूबाजूला इतका पसरतो की जणू काही तुम्ही परफ्यूम मारला आहे. इतका आणि सुंदर सुगंध येतो ह्या रातराणीचा की असे वाटतं सारखं तिथेच बसावं. पण आता ते झाड आमच्या घरी नाही पण त्याची आठवण मात्र अजूनही येते.
रातराणीच्या छोट्या छोट्या फुलांचे गजरे ही बनवले जातात, सुईत ही छोटी छोटी फुले ओवून हे गजरे बनवले जातात केसात घातल्यावर खूप छान वाटतात.
या रात राणीच्या झाडांची पाने लांबट सुरू सारखी असतात आणि फुलाचा रंग पांढरा आणि हिरवट असा असतो. फुळलल्यावर खूप सुंदर दिसते हे झाड. रातराणी घरात लावणे किंवा घराच्या समोर लावणे अगदीच शुभ मानले जाते या झाडामध्ये घरात तुमच्या वास्तुदोष असेल तर दूर होतो.
रातराणीच्या फुलाचा सुगंध घेतल्याने अजूनही फायदे मिळतात. तुमचे जर स्नायू दुखत असतील तर या फुलांचा वास घ्या शिवाय या वासाने मानसिक ताण, भीती ही निघून जाते.
रातराणी याच्या फुलांपासून वासाचे अत्तर बनवले जातात. या अत्तराचा वापर केल्यास तुम्हाला नक्की फरक पडेल. अंघोळीच्या पाण्यात किंवा याचा वास घेतल्याने मन शांत होते डोके दुखी असेल तर निघून जाते, घामाचा वास अंगाला येत नाही.
म्हणतात ना एखाद्या वासाचा चांगलाच प्रभाव आपल्या शरीरावर पडू शकतो. त्यासाठी तुम्ही रातराणीचे झाड ही घराच्या आजूबाजूला लावू शकता.
असं म्हणतात की रातराणीचे झाडावर साप जास्त आकर्षित होतात. त्याचे प्रमुख कारण काय असू शकते तर या फुलांवर किडे जास्त आकर्षित होतात आणि त्या किड्यांना खायला बेडकं येतात याच बेडकाना खाण्यासाठी कदाचित गावा ठिकाणी साप रात राणीच्या झाडावर येत असावेत पण सध्या शहरा ठिकाणी हे कमीच पाहायला मिळते.

तुम्हाला आलेला रातराणीचा अनुभव आमच्यासोबत शेअर करा. हे पण वाचा पावसाळ्यात कपडे लवकर कसे कसे सुकवायचे ते पाहूया.
1 comment
[…] […]