Home संग्रह ससा या प्राण्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

ससा या प्राण्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का

by Patiljee
1343 views

ससा हा एक सस्तन प्राणी आहे त्याला काही लोक घरात आणून पाळतात. पण रानटी ससे आकाराने खूप मोठे असतात. काही लोक खाण्यासाठी त्याची शिकार करतात. ससा हा मुळात शाकाहारी प्राणी आहे. तो गवत खाऊन तसेच शेतातील भाज्या किंवा गाजर, आपल पोट भरत असतो. ससा हा पांढरा तसेच पिवळट तपकिरी रंगाचां किंवा काळ्या रंगाचां असतो, सफेद ससे त्यांच्या पांढर्‍या शुभ्र रंगामुळे विशेष उठून दिसतात. सास्याची सर्वात मोठी जात जर्मन जायंट आहे तर सर्वात लहान जात आहे नेदरलँड द्वार्फ आहे.

सशाचे डोळे हे चहूबाजूंनी फिरणारे असतात. अत्यंत चपळ असणारे ससे हे सहसा आपल्या हाती लागत नाहीत. ते दिवसभरातून आठ वेळा झोप काढत असतात. सश्यांचे जीवनमान हे जवळ जवळ 12 वर्षाचे असते. सश्याच्या तोंडात 28 दात असतात पण हे दात जसं जसे दिवस वाढत जातात तसतसे या दांताचे आकार ही वाढत जातात. प्रजातींपैकी जगभरात 300 हून अधिक प्रजाती आहेत. मित्रानो तुम्हाला ही ससा पाळण्याची आवड आहे तर तुम्ही ही पाळू शकता पण त्याअगोदर काही गोष्टी लक्षात ठेवा. जेणेकरून तुम्ही ससा पाळण योग्य पद्धतीने करू शकाल.

पहिली गोष्ट म्हणजे ससा पाळण्यासाठी खरचं तुमच्याकडे इतका पुरेसा वेळ आहे का? ही गोष्ट अगोदर लक्षात घ्यायला हवी. ससा हा कायदेशीर जोडधंदा आहे एखाद्या गरीब शेतकऱ्याला ही हा धंदा करणे हितकारक आहे. कुक्कुटपालन आणि शेळीपालन यांसोबत ससे पालन हा जोडधंदा केला जाऊ शकतो. थोड्याशा जागेत आणि कमी खर्चात हा व्यवसाय करता येतो. काही संस्था ससे पाळण कसे करायचे यांचे संपूर्ण प्रशिक्षण देतात शिवाय व्यवसायासाठी ससे ही पुरवतात. सशांचे मांस हे अधिक रुचकर आणि स्वादिष्ट असल्यामुळे याची मागणी वाढत चालली आहे.

Please follow and like us:

Related Articles

0 comment

Parshuram kute January 29, 2020 - 3:52 pm

Yes.I am interested.

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल