मित्रानो आजच्या काळात महागाई इतकी वाढलेली आहे की उरले सुरलेल काहीही फेकायला जीवावर येते. मग ते घरातील अन्न असो किंवा आपल्या वापरातील वस्तू असो. आपल्या सारख्या मध्यमवर्गीय कुटुंबासाठी प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ते म्हणजे आपण अंघोळीसाठी वापरलेल्या साबणाच्या तुकड्याचे काय करतो तर फेकून देतो. असेच आपल्यापैकी काहीजण करत असतील पण याच तुकड्यांचा उपयोग करून तुम्ही रोजच्या उपयोगासाठी हॅण्ड वॉश बनवू शकता. सहज आणि सोप्या प्रकारे बनवण्यात येणारे हॅण्ड वॉश नक्की तुम्हाला आवडेल.

आता तुम्ही दरवेळी उरलेले तुकडे बाजूला ठेवून साठवून ठेवा आणि ज्या वेळी हॅण्ड वॉश बनवायला घ्याल तेव्हा हे तुकडे घेऊन शिवाय मिक्सर आणि फक्त एक झाकण भर डेटॉल लिक्विड, आणि ग्लास भरून गरम पाणी यांची आपल्याला गरज आहे.
सर्वात पहिले एकत्र जमवलेले सर्व साबणाचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात टाका आणि तुकडे बुडतील इतकंच पाणी टाका. आता हे मिश्रण वाटून एकजीव करा. त्यानंतर त्यामध्ये एक ग्लास गरम पाणी ओता आणि मिक्स करा त्यावर डेटॉल लिक्विड ओता आणि पुन्हा मिक्स करा. त्यानंतर हे आपले घरगुती हॅण्ड वॉश तयार आहे. जुन्या बाटलीमध्ये ओतून याचा वापर तुम्ही रोज हात धुण्यासाठी करू शकता.
1 comment
[…] घरामधे साबण हा असतोच. त्या साबनेने प्रथम ती जखम […]