कितीही काही केलं तरी आयुष्य जगायला पैसा खूप गरजेचा आहे. त्यासाठी माणूस काहीही करायला तयार होतो. अशीच एक बातमी आज समोर आली आहे. जगातील प्रसिद्ध सुपर कार ड्रायव्हर रेनी ग्रेसी पोर्न स्टार बनली आहे. तिच्या ह्या क्षेत्रात पाय ठेवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. २५ वर्षीय रेसीने स्वतः ह्या गोष्टीची माहिती आपल्या सोशल नेटवर्कर वरून दिली आहे.
तिने ह्या गोष्टी बद्दल स्पष्ट मत सांगितले आहे. तिच्या मते ह्या क्षेत्रात खूप पैसा आहे. आणि ह्या क्षेत्रात पाऊल टाकल्याने मला कोणत्याच प्रकारची लाज वाटत नाहीये. कार रेसिंग मुळे खूप कमी पैसे मला मिळतं होते. योग्य फॉर्म नसल्याने काम सुद्धा वेळेवर मिळत नव्हते. एकवेळ अशी आली होती की माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते. मी पैसे मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण सर्व निष्फळ ठरले.
म्हणूनच मी माझ्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी ह्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे.
तिच्या मते ह्या क्षेत्रातून तिला खूप मोठं आर्थिक पाठबळ मिळेल. एका आठवड्यातील फोटो आणि व्हिडिओ मुळे २५ हजार डॉलर एवढा नफा तिला मिळणार आहे. २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया मध्ये ती महिला कार रेसर होती. V8 सुपर कार च्या रेसिंग मध्ये ती खूप प्रसिद्ध होती. पण तिला तिचा फॉर्म अबाधित ठेवता आला नाही. म्हणून तिच्या जागेवर दुसऱ्या कुणाची वर्णी लागली होती.
म्हणतात ना माणसाचे आयुष्य माणसाला कुठे नेईल सोडेल हे माणूस सुद्धा जाणून घेऊ शकणार नाही.