Home हेल्थ राजगिरा उपवासाला खायचा पदार्थ तुम्हाला माहीतच असेल पण यातील उपयुक्त घटक माहीत नसतील

राजगिरा उपवासाला खायचा पदार्थ तुम्हाला माहीतच असेल पण यातील उपयुक्त घटक माहीत नसतील

by Patiljee
369 views

राजगिरा हा आपल्याकडे फक्त उपवासाला खातात पण या राजगिराचे पौष्टीक घटक लक्षात घेतले तर हे तुम्ही रोज खायला लागाल. खर तर जागतिक दर्जावर राजगिरा याला सुपर फूड म्हणून घोषित केले आहे. पहिली गोष्ट म्हणजे ही वनस्पती मूळची भारतातील नाही ती अमेरिका वरून भारतात आली आहे. या राजगिरामध्ये काय नाही असे नाही, अनेक असे घटक आहेत जे आपल्या शरीराला उपयोगी आहेत आणि म्हणून खरतर उपवास करण्यासाठी राजगिरा खाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

राजगिरा हा मुळात पचायला खूप हलका असतो. कॅल्शियमचे प्रमाण या राजगिरा मध्ये इतकं आहे की दुधाच्या दुपटीने यामध्ये कॅल्शियम असते. शिवाय व्हिटॅमिन सी ची गरज आता तरी सर्वानाच आहे. हे व्हिटॅमिन सी या राजगिरा मध्ये मुबलक प्रमाणत आहेत, त्यामुळे केस, त्वचा आणि हिरड्या तसेच व्हिटॅमिन सी मुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते ही गोष्ट लक्षात घ्या. राजगि-यात आयर्न, फास्फोरस, मॅग्नेशियम, मॅग्निज्, पोटॅशियम, झिंक तसेच व्हिटॅमिन ई, तसेच प्रोटीन, फायबर सुध्दा मुबलक प्रमाणत असते.

राजगिरा खाल्याने प्रसूती झालेल्या स्त्रियांमध्ये दुधाची रुद्धी होते. त्यामुळे त्यांच्यासाठी हा उत्तम आहार आहे. शिवाय आयर्नचे प्रमाण ही भरपूर असल्यामुळे ज्यांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे आशा लोकांनी राजगिरा आपल्या आहारात समावेश करावा. केसांच्या समस्या केस गळणे आणि पांढरे होणे यावर ही राजगिरा उपयुक्त आहे. यामध्ये मॅग्नेशियमची मात्रा असल्यामुळे ज्यांना माईग्रेनचा त्रास आहे अशा लोकांसाठी राजगिरा उपयोगी आहे.

केसवाढीसाठी, त्वचेवर चमक येण्यासाठी, दृष्टी वाढण्यासाठी तज्ज्ञ मंडळी राजगिरा खाण्याचा सल्ला देतात. तसेच हाडे मजबूत होण्यासाठी, लठ्ठ व्यक्तीसाठी राजगिरा वरदान होय. इतक्या सा-या गुणांमुळे राजगि-यास ‘अमरंथ’ असे संस्कृतमध्ये नाव दिलं गेलं आहे. कुपोषणग्रस्त भागामध्ये राजगिरा व त्याचे पदार्थ वापरता येऊ शकतात. यात असणारे प्रोटीन या प्रोटीन मध्ये इन्सुलिनचे प्रमाण आढळते त्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी राजगिरा खाणे अत्यंत उपयुक्त आहे.

ज्या लोकांना नुसता राजगिरा खायला आवडतं नाही अशा वेळी लाडू, धिरडी, थालिपीठं, डोसे, उपमा याच्या पिठात थोडे राजगिरा पीठ मिक्स करा. त्यामुळे पोषण ही मिळेल आणि कळणार ही नाही. राजगिरा हा सर्व घटकांनी जरी उपयुक्त असला तरी ज्यांना किडनीची आजार आहे, अशांनी राजगिरा खाऊ नये. कारण यामध्ये ऑक्सलेट नावाचे रसायन आहे. ज्यामुळे किडनी स्टोन वाढू शकतो. लहान मुलांना चॉकलेट ऐवजी राजगिरा चिक्की द्या मोठ्यांनी ही तसेच करा.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल