२०१२ साली प्रदर्शित झालेली असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकेतून रश्मी अनपट लोकांना ईश्वरी या भूमिकेतून खूप आवडली होती. त्यावेळी तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. तिचा जन्म पुण्यात झाला, तिचे लहानपणा पासूनचे शिक्षण पुण्यातच झाले आहे. ती १९८८ या साली जन्माला आली. रश्मी ही अभिनेत्री कमी काळातच लोकांच्या पसंतीस उतरली आहे.
तिची मालिका म्हणजे झी युवा या या चॅनलवर प्रदर्शित झालेली फ्रेशर” ही मालिका तुम्हाला आठवत असेलच यातून तिने मनवा राजे हे कॅरेक्टर केले होते. या मालिकेतील ही अभिनेत्री लोकांनां आवडली होती.
यापुढे जाऊन तिने पुढचे पाऊल आणि सुवासिनी या दोन मालिकांमध्ये वेगळीच म्हणजे नकारात्मक भूमिका केल्या होत्या. या भूमिका ही तिने उत्तमरित्या केल्या होत्या आणि लोकांनीही त्या आवडल्या होत्या.
शालेय शिक्षण घेत असताना तिने अनेक नाटक आणि एकांकिका मध्ये भाग घेतला आहे. त्यानंतर तिचे यात भागात करीयर करायचे ठरवून मुंबई गाठली आणि तिला असावा सुंदर स्वप्नांचा बंगला मालिकेत काम मिळाले. त्यानंतर तिला अनेक मराठी मालिकेमध्ये काम मिळाले तिच्या या प्रवासा दरम्यान २०१३ ला अमित खेडेकर या अभिनेता सोबत तिने लग्न केले आणि २०१८ साली या दोघांना एक मुलगा ही झाला आहे.

कुलस्वामिनी ही मालिका केल्यानंतर तिने जवळ जवळ २ वर्ष ब्रेक घेतला कारण तूच लहान बाळ होत. आता नव्या मालिकेमध्ये पाहायला मिळते आहे अग्निहोत्री २ हे मालिकेचे नाव आहे. पण लवकरच ही मालिका आपला गाशा गुंडाळणार आहे.