मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अचूक टायमिंगने सर्वांना खळखळून हसवणारी रसिका जोशी आपल्याला सर्वानाच माहीत आहेत. पण खूप कमी लोकांना माहिती आहेत की त्या आज आपल्यात नाही आहेत. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ही बातमी माहीत असेल पण ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी ही बातमी. रसिका जोशी ह्यांच्या बद्दल अधिक जाणून घेऊया.

१२ सप्टेंबर १९७२ मध्ये रसिका जोशी ह्यांचा जन्म ब्राम्हण कुटुंबात झाला होता. लहानपणापासून त्यांना अभिनयात रुची होती. म्हणून शालेय जीवनापासून त्या एकांकिका मध्ये भाग घ्यायच्या. उंच माझा झोका ह्या नाटकापासून त्यांना खरी ओळख मिळाली. ह्या नाटकात अविनाश मसुरेकर आणि स्मिता तळवलकर ह्यांच्या सोबत त्यांनी काम केलं. त्यांचे लग्न अभिनेता आणि दिग्दर्शक गिरीश जोशी ह्यांच्या सोबत झाले होते. ये दुनिया हैं रंगिन, बुवा आला, प्रपंच आणि घडलेय बिघडलेय ह्यासारख्या मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी कामे केले होते. व्हाइट लीली अँड नाईट रायडर ह्या नाटकाचे ते स्वतः लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय करत होत्या.
मराठी मध्ये खबरदार, जबरदस्त आणि आई नंबर १ सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्या नजरा स्वतः कडे ओढवून घेतल्या. ह्यानंतर त्यांनी अनेक हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने चार चांद लावले होते. ह्यात ढोल, मालामाल विकली, भुल भुल्लैया, वास्तू शास्त्र, दे ताली, डरना जरुरी है, गायब, एक हसीना थी ह्या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. भूल भुल्लैया मध्ये केलेला अभिनय आजही लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणून सोडतो.
एवढी सर्वगुण संपन्न अभिनेत्री एवढ्या लवकर काळाच्या पडद्याआड जाईल हे कुणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल. Leukaemia मुळे त्यांचे ७ जुले २०११ रोजी निधन झाले. त्यांच्या ह्या अचानक एक्झिट मुले मराठी सिनेसृष्टीत खूप मोठा धक्का बसला होता. पण म्हणतात ना चांगली माणसे देवाला पण आवडतात तेच काहीसे रसिका जोशी ह्यांच्यासोबत झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.