डान्सर, ऍक्टर आणि डायरेक्टर अशा अनेक क्षेत्रात यशस्वी ठरणारा रेमो डिसोजा तुम्हाला माहीतच आहे, त्यांच्या वडिलांचे नाव गोपी नायर आहे ते एक नेवी ऑफिसर होते. त्यांची पत्नी लीजेल शिवाय सध्या त्याला ध्रुव आणि गबिरिल ही दोन मुळे आहेत. इतका चांगला डान्सर असून ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे का की त्याने डान्स हे कोणाकडून शिकले नाही तर मायकल जैक्सनचे व्हिडिओ पाहून तो स्वतः डान्सर झाला आहे. पहिले पहिले पैशाच्या कमतरतेमुळे उपाशी झोपणे या सर्व गोष्टी त्याच्या नशिबी आल्या पण जेव्हा बॉलिवुड मध्ये त्याचा प्रवेश झाला तेव्हा या सगळ्या गोष्टींना पूर्ण विराम मिळाला.
रेमो डिसोजा हा एक उत्तम कोरिओग्राफर आहे शिवाय त्याची पत्नी लिजेल ही सध्या एका खास चर्चेमध्ये आपल्याला दिसून येते ती म्हणजे तिने आपले वजन खूप कमी केले आहे. आता ती पहिल्यापेक्षा खूप सुंदर दिसायला लागली आहे. तिने इंस्टाग्राम वर आपले सध्याचे फोटो अपलोड केले आहेत आणि या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी खरोखर तिने खूप मेहनत ही घेतली आहे. याचे सर्व श्रेय ती आपल्या पतीला म्हणजे रेमोला देते कारण इतकं वजन कमी करणे म्हणजे खायची कामे नाहीत. त्यासाठी ही कमी मदत लागेल ती रेमो ने केली आहे.

शिवाय या प्रवासात आपल्या पत्नीचा बदलणारा मुड, राग, चिडचिड हे सगळं काही रेमो ने सहन केले आहे. गेल्या वर्षी त्याने त्यांच्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाल्याने पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातला आणि त्यांच्या ख्रिश्चन पद्धतीने पुन्हा लग्न केले. कोणाला वाटेल काय उगाच पैशाचा खर्च आणि मोठेपणाचा आव पण प्रत्येकाला या जगात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी योग्य तो दिवस असतो आणि त्याने जे केले ते त्याच्या बायको बद्दलचे प्रेम असेल यात आपल्याला वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही.