Home हेल्थ भात खाल्याने आपल्या शरीराला होतात नुकसान हे खरं आहे का खोटं?

भात खाल्याने आपल्या शरीराला होतात नुकसान हे खरं आहे का खोटं?

by Patiljee
1964 views

भात हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे हे सर्वांना माहीतच आहे. कर्बोदके आणि कॅलरीज याचे भरपूर प्रमाण भातामध्ये असते. पूर्वीच्या तांदळात आणि आताच्या तांदूळ मध्ये फरक ही खूप पडला आहे हे सुध्दा एक सत्य आहे. पण भात खाणे याबद्दल अनेकांच्या मनात तर्क वितर्क आहेत आणि आज आपण हेच जाणून घेणार आहोत की भात खाल्याने जास्त आपल्या शरीराला फायदा होतो पण तो खाताना काही मर्यादा असायला हव्यात.

काही लोकांना वाटते भात खाल्याने आपल्या शरीराची चरबी वाढते तर काहींना हे चुकीचे वाटते शेवटी ते प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. आता कोकणातील लोक आपल्या भात खाताना दिसतात पण ते अंगाने जास्त जाडजूड नसतात. भात हा पचायला एकदम हलका असतो. त्यामुळे ज्या लोकांना पोटाचे आजार आहेत अशा लोकांनी भात खावा जेणेकरून अन्न लवकर पचेल.

ज्या लोकांना आपल्या शरीरात सोडियमचे प्रमाण कमी करायचे आहे अशा लोकांनी चपाती खाऊ नये कारण चपाती मध्ये सोडियम जास्त प्रमाणत असते आणि भातात सोडियम नसते. व्हिटॅमिन डी, लोह, फायबर, कॅल्शिअम, थायमीन आणि रायबोफ्लेविन हे भरपूर प्रमाणत भातात आढळतात त्यामुळे आजारी व्यक्तीला तांदळाची पेज खायला दिली जाते.

भात खायचे असेल आणि आपल वजन ही वाढू द्यायचे नसेल अशा लोकांनी भात शिजवताना त्यात असलेले पाणी काढून टाकावे. एक बाउल भात खाणे तुमच्या शरीरासाठी हितकारक असते. त्यामुळे तुमच्या शरीरात मेटाबोलिझन वाढते आणि उच्च रक्तदाब ही नियंत्रणात राहतो. तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुम्ही भात खाणे टाळा पण तुम्ही ब्राऊन राइस खाऊ शकता.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल