Home करमणूक रिंकुला अशा अवतारात आजपर्यत पाहिले नसेल बघा

रिंकुला अशा अवतारात आजपर्यत पाहिले नसेल बघा

by Patiljee
289 views

रिंकू राजगुरू हिला आपण सगळेच ओळखत आहोत केव्हापासून तर तिच्या पहिल्या सैराट या चित्रपटापासून. सुपर सुपर हिट ठरला हा चित्रपट आणि या चित्रपटांतून रिंकू सारखी कलाकार आपल्याला भेटली पण आता हीच रिंकू पुन्हा आपल्या भेटीला येत आहे तिच्या नव्या चित्रपटातून त्याचे नाव आहे ” मेकअप” यात रिंकू सोबत अभिनेता म्हणून चिन्मय उदगीरकर हा देखील झळकणार आहे. पहिल्यांदाच एक फ्रेश जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Source Google

या सिनेमात रिंकूचे दोन रूप पाहायला मिळणार आहेत एक तर लाजरी बुजरी आणि साधी राहणीमानात राहणारी रिंकू आणि दुसरी म्हणजे एकदम बिनधास्त आणि धाडशी अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेमारू एन्टरटेन्मेंट यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे तर गणेश पंडित यांनी मेकअप या सिनेमा चे लेखन केलेले आहे नवीन विषय देण्यात यांचा हातखंडा आहे आणि म्हणून या नवीन येणाऱ्या चित्रपटात काहीतरी वेगळे आणि भारी पाहायला मिळेल हे नक्की.

येत्या नवीन वर्षी म्हणजे 7 फेब्रुवारीला हा सिनेमा सर्वांच्या भेटायला येणार आहे चिन्मय आणि रिंकू या दोघांनी यागोदर चित्रपटात काम केले आहे पण आता येणाऱ्या या जोडीचे स्वागत प्रेक्षक कशा प्रकारे करणार आहेत हे आपल्याला तेव्हाच कळेल.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल