आज एक दुःखद बातमी समोर आली आहे. टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी प्रेक्षा मेहता हिने वयाच्या २५ व्या वर्षी आपल्या राहत्या घरी गळ्याला डोरखंड लाऊन आत्महत्या केली आहे. लॉक डाऊन चालू होण्यापूर्वी ती आपल्या घरी म्हणजेच इंदूरच्या बजरंग नगर इथे गेली होती. यापूर्वी ती मालिकांमध्ये काम करण्यासाठी मुंबई मध्ये स्थित होती. टाइम क्राईम पेट्रोलच्या अनेक एपिसोड मध्ये कामे केली आहेत.
लॉक डाऊन असल्याने अनेक शूटिंग लांबणीवर गेल्या होत्या. त्यामुळे ती डिप्रेशन मध्ये होती. असे तिच्या कुटुंबातील व्यक्तींचे म्हणणे आहे. स्वतःला संपवण्यापूर्वी तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर निराशाजनक पोस्ट केली होती. त्यात असे लिहले होते की “सर्वात वाईट तेव्हा होतो जेव्हा आपल्या स्वप्नांचा चक्काचूर होतो”.

गेल्या काही वेळेपासून ती डिप्रेशनमध्ये वाटत होती. सोमवारी रात्रीच्या वेळेस ती आपल्या रूम मध्ये गेली. आपल्या सोशल मीडियावरून एक दुखी स्टेटस पोस्ट केली. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिचे बाबा ती बाहेर येत नाही म्हणून उठवण्यासाठी तिच्या रूममध्ये गेले तर तिचा मृतदेह त्यांना आढलून आला. त्या भागातले पोलिस अधिकारी राजीव भदोरिया ह्यांनी माहिती दिली की तिच्या आत्महत्येचे कारण आम्ही शोधत आहोत.
एक सुसाईड नोट सापडली आहे पण त्यात आत्महत्येचे कारण स्पष्ट केलेले नाही आहे. लॉक डाऊन चालू असल्याने अनेक लोक आपल्या कामासाठी चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे त्यांचे डिप्रेशनमध्ये जाणे हे एक कारण असू शकते. ह्या आधी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत. काहीच दिवसापूर्वी अभिनेता मनमित ग्रेवाल ने सुद्धा आत्महत्या केली होती. (हे ही वाचा: रेडी सिनेमात काम करणाऱ्या ह्या युवकाचा आज वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी निधन)