Home करमणूक आज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड

आज सुद्धा मराठी सिने सृष्टीला मोठा धक्का, दिग्गज अभिनेत्री सरोज सुखटणकर काळाच्या पडद्याआड

by Patiljee
1458 views
सरोज सुखटणकर

ज्येष्ठ मराठी ज्येष्ठ अभिनेत्री सरोज सुखटणकर याचे आज निधन झाले आहे. त्या आता आपल्यात राहिल्या नाहीत त्यांचा आज मृत्यू झाला. त्यांचे वय आता ८४ इतके होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या वयात जवळ जवळ ८० पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत.

त्यांनी फक्त चित्रपट नाही तर मालिका आणि नाटकामध्ये ही आपली कलाकारी दाखवली आहे. त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले आहेत. ह्यात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांना २००६ मध्ये चित्रकर्मी पुरस्कार ही मिळाला आहे.

त्यांच्यावर हातकणंगले तालुक्यातील रुई या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची एक चरित्र अभिनेत्री म्हणून ओळख आहे. सध्या त्या एका मालिकेत काम करत होत्या. ह्या मालिकेत सुद्धा त्यांचे काम लोकांना आवडत होतं.

तुझं आहे तुझपाशी, प्रेमा तुझा रंग कसा, मुंबईंची माणसं, दिवा जळू दे सारी हे त्यांचे नाटक लोकप्रिय झाले होते. त्यांनी लग्न केले नव्हते ‘एकटा जीव सदाशिव’, ‘जोतिबाचा नवस, दे दणादणट, लेक चालली सासर ला या चित्रपटा मधून त्यांची भूमिका अत्यंत गाजली होती. अलका कुबल यांच्यासोबत केलेला धनगरवाडा हा सरोज सुखटणकर यांचा अखेरचा चित्रपट ठरला.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल