मित्रानो तुम्हाला जर का कोणत्याही ध्येय पर्यंत पोचायचे असेल तर त्यासाठी मेहनत तर घ्यायलाच हवी आणि ते कोणाला चुकलेले नाही. रोहित शेट्टी याचे नाव ऐकल्यावर तुम्हाला समोर फक्त अँक्शन ने भरलेला आणि कॉमेडीच्या दिलखुलास डायलॉग ने भरलेला चित्रपट दिसेल. त्याने दिग्दर्शन केलेलं चित्रपट लोकांना खूप आवडतात कारण ते बघण्यात एक वेगळीच मजा असते. पण हा रोहित शेट्टी आता करी उंच शिखरावर पोचला असला तरी त्याने सुद्धा याअगोदर अशी काम केली आहेत ज्यांचा तुम्ही विचार ही केला नसेल.
आताचा हा हिट दिग्दर्शक याअगोदर कोणते काम करत होता हे तुम्हाला माहीत आहे का? त्याने त्या वेळी अभिनेत्रींच्या हाताखाली स्पॉट बॉय म्हणून काम केले आहे शिवाय अजय देवगण या अभिनेत्यांच्या हाताखाली ही त्याने स्पॉट बॉय म्हणून काम केले आहे. त्या अभिनेत्रींची नावे आहेत काजोल आणि तब्बू. एका अभिनेत्रीच्या तर त्याने साड्या ही इस्त्री केल्या आहेत ती अभिनेत्री म्हणजे तब्बू होय. त्याने “हकीकत” या चित्रपटाचे शुटींग चालू असताना हे काम केले आहे.
हे काम करत असताना त्याला रोजचा पगार किती होता हे वाचून तर तुम्ही थक्क व्हाल. रोज त्याला फक्त 35 रुपये मिळत होते. पण त्याच्या जिद्दीची आणि चिकाटीची खरोखर प्रशंसा करायला हवी ‘फूल और काँटे’, ‘सुहाग’, ‘प्यार तो होना ही था’ आणि ‘राजू चाचा’ या चित्रपट साठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
येत्या काही दिवसात आपल्याला रोहित शेट्टी याने दिग्दर्शन केलेला ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. इतर चित्रपट प्रमाणे हा ही चित्रपट लोकांना नक्की आवडेल. सिंघम आणि सिंबा च्या अभूतपूर्व यशानंतर सुर्यांवंशी येतोय म्हणजे नक्कीच धमाका होणार ह्यात काही शंका नाही.