Home बातमी लॉक डाऊन सुरू असतानाही हरियानवी छोरा आणि मेक्सिकोन मुलीने केलं लग्न

लॉक डाऊन सुरू असतानाही हरियानवी छोरा आणि मेक्सिकोन मुलीने केलं लग्न

by Patiljee
196 views

सध्या भारतात लॉक डाऊन सुरू असल्याने सर्वच कार्य स्थगित आहेत. अशातच अनेकांची लग्ने सुद्धा लांबणीवर गेली आहेत. लग्नाच्या तारखाही निघून गेल्यात तर काहींच्या तारखा येणार आहेत. पण अशा परिस्थितीत लग्न समारंभ होणे कठीणच आहे. पण तरीही रोहतक मधील भारतीय मुलगा निरंजन कश्यप आणि मॅक्सिको तरुणी डाना जोहेरी ओलिवेरोसने लग्न केल्याची बातमी समोर आली आहे.

दोघांनी मिळून सोमवारी जिल्हा मजिस्ट्रेट कोर्टात रात्री आठ वाजता लग्न केले. ह्या दोघांचं लग्न तर आधीच ठरले होते. दोघांचीही ओळख ऑनलाईन झाली होती. पण लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांचे लग्न लांबणीवर गेले होते. ह्याच शहरातील सूर्या कॉलनी मध्ये राहणारे गृहस्थ निरंजन कश्यप ह्यांनी उपायुक्त आर एक वर्मा ह्यांच्या कार्यालयात लग्न होण्यासाठी निवेदन दिले होते. दोघांच्याही मनाचा विचार करत उपायुक्तांनी सोमवारी रात्री आठ वाजता कोर्ट उघडून दोघांचे लग्न लाऊन दिले.

भारतीय मुलगा आणि विदेशी मुलगी डाना ह्या दोघांची मैत्री खूप आधीपासून चर्चेचा विषय ठरली होती. ऑनलाईन स्पॅनिश भाषेचा कोर्स शिकत असताना दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २०१७ मध्ये हा मुलगा तिला भेटण्यासाठी मेक्सिकोमध्ये सुद्धा गेला होता. एक वर्षाने म्हणजेच २०१८ मध्ये ती विदेशी मुलगी तिच्या आईसोबत भारतात सुद्धा रोहतक मध्ये भेट देण्यासाठी आली होती.

तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या परवानगी आधी ह्या लग्नासाठी घेण्यात आली होती. व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन परवानगी देण्यात आली. मगच रात्री आठ वाजता लग्न लावण्यात आले. लग्न लावताना फक्त चार व्यक्ती दोघांच्या सोबत होते. भारतात अनेक ठिकाणी अशी लोक तुम्हाला आढलून येतील ह्यांचे लग्न तर ठरले आहे पण लॉक डाऊन मुले लांबणीवर गेले आहे.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल