Home हेल्थ रोजच्या आहारात घेतले जाणारे हे पदार्थ असू शकतात भेसळयुक्त कसे ओळखाल

रोजच्या आहारात घेतले जाणारे हे पदार्थ असू शकतात भेसळयुक्त कसे ओळखाल

by Patiljee
558 views

रोजच्या आहारात घेतले जाणारे हे पदार्थ असू शकतात भेसळयुक्त कसे ओळखाल

आज लोकसंख्या इतकी जास्त वाढली आहे की अशा लोकसंख्येसाठी विविध वस्तू पुरविणे कठीण गोष्ट झाली आहे. त्यासाठी लोक भेसळयुक्त पदार्थ वापरून तो पदार्थ आपल्याला विकतात आणि आपण ते दिसायला ही सुंदर असल्याने घेतो पण हे असले पदार्थ आपल्या शरीरासाठी खरंच खूप घातक आहेत. हे विष आपल्या पोटात गेल्यानंतर आपल्या शरीराला याचे नुकसानच होणार आहे. आणि म्हणून आज आम्ही अशा काही रोजच्या आहारात असणाऱ्या खाद्य पदार्थांबद्दल बोलणार आहोत ज्यामधे तुम्हाला भेसळ आहे हे कधी ओळखाल याबद्दल थोडी माहिती देणार आहोत.

हिरवा मटार
हिरवा मटार आपण जेव्हा पटकन भाजी बनवायला काहीच नसते तेव्हा हिरवा मटार नक्कीच करतो. पण हा हिरवा मटार बाजारात आल्यावर तो त्याच्यावर कलर चढवला जातो आता हे तुम्हाला कसे समजेल तर जो मटार तुम्हाला जरा जास्तच हिरवा दिसत असेल त्यावर हिरवा रंग वापरतात. या मटारला तुम्ही फोडले असता त्यात तुम्हाला कोम दिसणार नाहीत.

अंडा
जेव्हा अंडा भेसळयुक्त आहे हे ओळखता येत नसेल तेव्हा अंडा फोडा त्यातील बिंद हा तुम्हाला जास्त पिवळ्या रंगाचा दिसेल.

सफरचंद
सफरचंद जेव्हा तुम्हाला जास्त आकर्षक दिसतील लाल भडक आणि वरून जास्त चमक असेल तर समजून हा त्यावर तुम्हाला प्रक्रिया केलेली आहे. त्यावर मेणाचा थर चढविलेला असतो जेणेकरून ते जास्त आकर्षक दिसावेत.

दालचीनी
शुद्ध दालचिनी हाताने लगेच तोडता येते आणि वजनाला ही हलकी असते. याविरुद्ध जर भेसळयुक्त दालचिनी घेतली तर टणक आणि जड असते.

दूध
दुधात भेसळ आहे की नाही हे कसे ओळखाल या एका ग्लासात थोडे दूध घ्या आणि ते घुसळत रहा जर ते नकली असेल तर त्यावर तुम्हाला फेस आलेला दिसेल अर्थात त्यात डिटर्जंट मिसळतात.

खोबरेल तेल
एका वाटीत खोबरेल तेल घ्या आणि ही वाटी फ्रीज मध्ये ठेवा हे तेल संपूर्ण पने गोठले तर समजा ते शुद्ध आहे आणि अर्धवट गोठले तर समजून जा त्यात भेसळ आहे.

मध
एका ग्लास मधे पाणी घ्या त्यात मधाचे तीन चार थेंब टाका हे पाण्यात टाकलेले थेंब जसेच्या तसे ग्लास च्या तळाशी जाऊन बसले तर समजा हे शुद्ध मध आहे जर ते पाण्यात मिसळले तर समजा त्यात साखर युक्त भेसळ आहे.

रवा
रव्या मध्ये कधी कधी पांढरी माती ही मिसळली जाते त्यामुळे आपल्याला हे लक्षात येणे ही कठीण आहे यासाठी हा रवा पाण्यात टाका तवा वरती तरंगेल आणि माती तळाशी बसेल.

मिठाई
सणासुदीच्या दिवसात मिठाई मध्ये जास्त प्रमाणत भेसळ असल्याची दिसून येते यासाठी ही भेसळ ओळखणे ही कठीण तर काय करावे? हायड्रोक्‍लोरिक अ‍ॅसिडचा एक थेंब टाकावा मिठाईचा रंग जांभळा झाल्यास समजून जा यात भेसळ आहे.

मिरची पावडर
मिरची पावडर मध्ये जास्त करून विटांचा चुरा मिसळतात. मिरची पावडर मध्ये भेसळ आहे हे तुम्ही कसे ओळखाल तर एका ग्लास मध्ये पाणी घ्या आणि त्यात थोडी मिरची पावडर टाका विटांचा चुरा तळाशी जाऊन बसेल तर मिरची पावडर काही काळ पाण्यावर तरंगते.

केळी
केळी आता तर पावडर लावून पिकावण्यात येतात त्यामुळे नुकसान खणाऱ्याच्या शरीराचे होते. पावडर लावून पिकवलेली केली तुम्हाला पिकलेली तर दिसतील पण त्या केळीचे देठ मात्र हिरवे असते.

Please follow and like us:

Related Articles

1 comment

उत्तम आरोग्य राखण्यासाठी केळी खाणे गरजेचे आहे. » Readkatha July 17, 2020 - 4:01 pm

[…] हा फळ तुम्हाला सफरचंद या फळा इतका महाग वाटत नसला तरी […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल