सारिका हिने 2007 ला बॉलिवुड मध्ये आपल्या पदार्पणाच्या सिनेमाने प्रसिध्दी मिळवली होती. त्यानंतर मात्र ती आपल्याला जास्त चित्रपटात दिसली नाही. चक दे इंडिया’ चित्रपटामधून तिने बॉलिवुड मध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात सागरिकाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा स्क्रीन पुरस्कार देण्यात आला होता आणि नंतर त्याच चित्रपटासाठी तिला लायन्स गोल्ड पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. या सिनेमात तिचा रोल खूप महत्त्वाचा होता. तिच्या फिल्मी करियरबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत राहिली आहे. सागरिका एका राजेशाही परिवारातील आहे तिच्या कारकिर्दीशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया
सागरिका हीच मुळ गाव कोल्हापूर एका राजघराण्यात तिचा जन्म झाला होता. विजय घाटगे आणि उर्मिला घाटगे यांची मुलगी दिसायला एखाद्या अभिनेत्री सारखी सुरेख त्यामुळे शाळेत असल्यापासूनच तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळत होती. सागरिकाला तिच्या शालेय शिक्षणाच्या काळातच चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर येऊ लागली होती. 2017 का तिने झहीर खान सोबत लग्न केले. जहीर खान भारतातीय क्रिकेट टीम मधील सर्वात तेज गोलंदाज आणि यॉर्कर किंग म्हणून ओळखला जातो. जहीर खान आणि सागरिका यांची भेट एका पार्टीत झाली आणि त्या दिवसापासून त्यांच्यात फक्त मैत्री होती.

त्यानंतर दोघे हळू हळू एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते कळले नाही. युवराज सिंग यांच्या लग्नात या दोघांचे प्रेम निदर्शनास आले. जहीर खान उत्कृष्ट मराठी बोलतो, लग्नानंतर सागरिका हिने चित्रपटात काम करायचे सोडून दिले आणि आपल्या संसारात लक्ष घातले. सागरिका नेशनल लेवल हॉकी प्लेयर आहे आणि म्हणून तिला चक दे इंडिया या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती.
आतापर्यंत सागरिकाने चक दे इंडिया, फॉक्स, मिले ना मिले हम, रश, दील दारिया, इरादा, मान्सून फुटबॉल आणि प्रेमाची गोष्ट अशा सिनेमात काम केलं आहे. ह्याच बरोबर खतरों के खिलाडी च्या सहाव्या पर्वात ती दिसली होती. ALT बालाजीच्या Boss ह्या वेब सिरीज मध्ये तिने निभावलेली एसीपी साक्षी हे पात्र चांगलेच भाव खाऊन गेले.