Home हेल्थ संत्र आणि लिंबू या दोघांची साल तुम्ही सुध्दा टाकून देत असाल ना?

संत्र आणि लिंबू या दोघांची साल तुम्ही सुध्दा टाकून देत असाल ना?

by Patiljee
443 views

मित्रानो फळं ही सर्वानाच खायला आवडतात पण त्याची सालं कोणालाच खायला आवडत नाही पण त्यांचे फायदे बघाल तर खरच आश्चर्यचकित व्हाल. आपण कोणत्याच फळाची साले उपयोगात आणत नाही. उलट ती फेकून देण्यातच धन्यता मानत असतो. पण ही साल कधीतरी आपल्या उपयोगात आणून पहिली आहे का जाणून घा संत्र आणि लिंबू या दोन्ही फळांच्या सालीत कोणते गुणधर्म आहेत. मग कधी तुम्ही फेकण्याची चुकी करणार नाही.

पहिली गोष्ट म्हणजे संत्र्याची साल कशी वापराल? तर तिला उन्हात कडक वाळवा आणि त्यानंतर तिचे बारीक तुकडे करून मिक्सर मधून तिची भुकटी बनवा आणि ही भुकटी तुम्ही तुमच्या उपयोगात आना.

या साली मध्ये असणारे गुणधर्म ज्यामुळे कर्क रोगाच्या पेशीची वाढ होण्यास रोखते आणि म्हणून ही साल जरी चवीला कडू असली तरी तिचा आहारात समावेश केल्याने आपली पचन संस्था मजबूत होते त्याचप्रमाणे कॉलेस्ट्रॉल ही कंट्रोल मध्ये राहतो.

संत्र्याच्या सालची पावडर यात थोडे दही मिसळ आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल. उन्हात काळवंडलेली चेहरा उजळतो.

संत्र्यात असलेले फायबर पाण्यात सहजतेने विरघळतात आणि त्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया झपाट्यानं वाढते. संत्र्याच्या सालेमुके मेटॅबॉलिक रेट वाढल जात, यामुळे शरीरात जमा असलेली चरबी झपाट्यानं विरघळते.

लिंबाची साल ही तुम्ही काळया डाग याच्यावर चोळू शकता यासाठी या लिंबाच्या सालीवर थोडा बेकिंग सोडा घेऊन तो आपल्या काळया पडलेल्या हाताच्या कोपऱ्यावर चोळा यामुळे काळपटपणा दूर होण्यास मदत होईल.

शिवाय ही लिंबाची साल फेकून द देता दातासाठी सुध्दा याचा उपयोग होतो. यासाठी ही साल दातावर घासावी त्यामुळे तुमचे दात पिवळे पडले असतील तर ते चमकायला लागतील

ही साल फ्रीज मध्ये ठेवल्याने सुध्दा आपल्याला येणारी दुर्गंधी निघून जाते. कपड्यावरील डाग घालवण्यासाठी साल त्या डाग वर घासून ते रात्रभर तसेच ठेवा. सकाळी डाग निघून जातील.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल