तर मित्रांनी सापाची जीभ मधूनच कापल्यासारखी का असते किंवा साप कात का उतरवत असतो ते आज आपण पाहणार आहोत. साप हा आपली जीभ ही वेगळ्या स्वरूपाने वापरत असतो म्हणजे माणूस किंवा इतर पशू पक्षी अन्न खाताना ज्याप्रमाणे आपल्या जिभेने अन्नाची चव घेत असतात त्याचप्रमाणे सापाचे नसते. साप हा जेव्हा जीभ बाहेर काढतो तेव्हा तो एक प्रकारचा वास घेत असतो त्यामुळे त्याला आपली शिकार कुठे आहे हे लगेच समजते त्याचबरोबर आपला शत्रू ही आपल्या आसपास आहे का याची भनक लागते.

आपले कान जसे आपल्याला आसपास कोण आहे याची ग्वाही देते त्याचप्रमाणे सापाची जीभ ही असेच काहीसे संवेदना देत असते म्हणजे सापाची उजव्या बाजूच्या जिभेला जास्त वास आला की समजा शिकार उजव्या बाजूला आहे आणि डाव्या बाजूच्या जिभेला वास आल्यावर समजून जा की शिकार डाव्या बाजूला आहे. जसे की आपण मनुष्य आपल्या कानाने लगेच समजतो की आवाज कोणत्या दिशेने येत आहे.
सापाचे पाय का नसतात हा प्रश्न तुम्हाला नेहमीच पडत असेल तर करोडो वर्षांपूर्वी सापाचे पाय होते त्यानंतर हळू हळू काळानुसार त्यांचे पाय आपोआप गायब झाले. तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की वैज्ञानिकांना कसे काय कळले की सापाला पाय होते म्हणून कारण आजही सापांच्या काही प्रजाती ची हाडे आपल्याला पाहायला मिळतात ज्यांना पाय होते.
मित्रांनी उडणारा साप कधी पाहिला आहे का तुम्ही तर काही साप हे उडतात पण पक्षांसारखे नाही तर काही लांबवर ते उडू शकतात. म्हणजे आपली शिकार करण्यासाठी ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडत असतात त्यामुळे इतर प्राण्यापासून सुद्धा त्यांचे रक्षण होते.
साप आपली कात का टाकत असतो तर सापाचे शरीर हे दिवसेंदिवस वाढत असते आणि त्यामुळे त्याचे शरीर जेव्हा वाढते तेव्हा वरची कातडी वाढत नाही आणि त्यामुळे साप वरची कात काढून टाकत असतो ज्याप्रमाणे आपली लहान पणापासून वाढ होत असताना आपल्याला न झालेले कपडे कोणाला देतो किंवा फेकून देतो.