Home कथा शेतकरी प्रियकर

शेतकरी प्रियकर

by Patiljee
7827 views
शेतकरी

हॅलो मदन मीना बोलतेय, बोलू शकते का थोडा वेळ?

काय ग मिने एवढ्या महिन्यांनी फोन केल्यास तो ही रात्री दीड वाजता? सर्व ठीक आहे ना?

नाही रे ठिक म्हणून तर फोन केला आहे. तू येतोस का सिटी हॉस्पिटलमध्ये जरा काम आहे.

हा एक तासात पोहोचतो मी थांब तू आलोच मी.

दवाखान्यात पोहोचल्यावर मदन धावत जाऊन मीनाकडे पोहोचला. काय ग काय झालं? मुलगा बरा आहे ना?

आता मात्र तिला रडू थांबले नाही. तिने मदनला घट्ट मिठी मारून रडू लागली. त्याने तिला शांत केले, प्यायला पाणी दिले आणि विचारले नीट सांग काय झालेय ते?

अरे काय सांगू माझा नवरा कामावरून घरी येत असताना भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना मागून टक्कर दिली. डोक्याला खूप जास्त मार लागला आहे. डॉक्टर बोललेत चार लाख खर्च होईल. सासू सासरे पण गावी असतात अशात कळलं नाही नक्की कुणाला फोन करू मग तुझी आठवण झाली आणि तुला फोन केला. माझ्याकडे सर्व सेविंग वैगेरे पकडून फक्त पन्नास हजार आहेत तरी मला अजुन तीन लाख पन्नास हजार कमी पडत आहेत. मला माहित आहे तुला बोलून चुकी करतेय मी पण माझ्याकडे पर्याय नाहीये दुसरा. मदत करू शकशील का माझी तू?

अग मीना तू रडू नकोस होईल सर्व ठीक आणि सध्या एवढे पैसे तर माझ्याकडेही नाहीयेत पण मी करतो काहीतरी थोडा वेळ दे मला मी येतो जाऊन. एवढे सांगून त्याने आपल्या गाडीला किक दिली आणि तिथून निघून आला. डोक्यात असंख्य विचार होते. रकमेचा आकडा खूप मोठा होता. एवढ्या रात्रीही बँक उघडे नसतील हे माहीत होते.

मीना आणि मदनचे एकमेकावर खूप मनापासून प्रेम होत. पण जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा मीनाच्या वडिलांना शेतकरी जावई नको होता. मदनकडे शेती तर खूप होती पण मिनाचे वडील मात्र काहीही ऐकले नाही. त्यांच्या मते शेतकरी असणे म्हणजे तो तुला खायला काय देणार? भवितव्य काय असणार तुमचं? जबरदस्तीने त्यांनी मीनाचे लग्न दुसरीकडे लाऊन दिले होते. त्यानंतर मात्र मदनने खचून न जाता शेती करायला सुरुवात केली. त्याने शेतात वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची झाडे लावली. आज तो पिकवत असलेले आंबे अनेक राज्यात जातात.

बाईक बाजूला लाऊन मदन चहाच्या टपरीवर थांबला. त्याने कुणालातरी फोन केला आणि पैसा मागवून घेतला. पैसे घेऊन तो हॉस्पिटल मध्ये पोहोचला. मीनाचे आई बाबा अगोदर येऊन पोहोचले होते. एवढ्या पैशांची मदत मदन करतोय बघून तिच्या वडिलांना कसेतरीच झाले. त्यांची मान शरमेने खाली गेली. पण मदन काहीही न बोलता तिथून निघून आला.

लेखक : पाटीलजी (आवरे उरण, रायगड)

Please follow and like us:

Related Articles

3 comments

दुसरं लग्न » Readkatha September 3, 2020 - 4:27 pm

[…] शेतकरी प्रियकर […]

Reply
रात्रीचं डबल सीट » Readkatha September 10, 2020 - 5:35 am

[…] शेतकरी प्रियकर […]

Reply
ऑनलाईन ओळख » Readkatha May 25, 2021 - 10:09 am

[…] शेतकरी प्रियकर […]

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल