हॉट आणि रेखीव चेहऱ्याची अभिनेत्री शिल्पा शेट्टी इतके वय होऊनही अजुन इतकी सुंदर कशी दिसते? हा प्रश्न सर्वानाच पडला असेल. लग्नाला इतके वर्ष होऊन शिवाय दोन मुलांची आई असणारी शिल्पा पहिल्या प्रथम जेव्हा तिने या फिल्म इंडस्ट्री मध्ये आपले पाऊल ठेवले तेव्हाची शिल्पा आणि आताची शिल्पा यातील खूप मोठा फरक आपल्याला कळून आलाच असेल, शिल्पा सांगते की तुमच्या शरीराला हवा तसा आकार देणे हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.
फक्त त्यासाठी तुम्ही एकनिष्ठ असायला हवं. तिला खाण्यापिण्याची खूप जास्त आवड आहे, ती सांगते की माझ्या आहारात रोजच साधे जेवण जे सर्वसामान्य माणसाचे असते, मी शाही जेवण कधीच करत नाही. तिला तिच्या आईने बनवलेले साधे जेवण आवडते.
पण या सगळ्या मागे नक्की काय कारण आहे हे तुम्हाला माहीत नसेल. याची आज आपण माहिती पाहणार आहोत. जेणेकरून तुम्हाला ही तुमच्यामध्ये असाच फरक हवा असेल तर तुम्ही ही करू शकता. तिच्या मते रोजच्या दिवसात तुमचा 70 टक्के आहार आणि 30 टक्के व्यायाम यावर भर द्यायला हवा.
शिल्पा शेट्टीचे वय सध्या तरी 43 वर्ष आहे पण तिला पाहून असे मुळीच वाटत नाही की तिचे वय इतके आहे. शिल्पा ने यासाठी आपल्या योगाची एक डिविडी लॉन्च केली आहे. ती पाहून ही तुम्ही तशा प्रकारचा योगा करू शकता तसेच तिचा स्वतःचा एक फिटनेस एप सुद्धा आहे.
दिवसाची सुरुवात
शिल्पा शेट्टी दिवसाची सुरुवात गरम पाण्याने करते म्हणजे या पाण्यात लिंबू, मध घालून हे पाणी सकाळी उठल्यावर घेते आणि रात्री 8 च्या आत ती आपले जेवण उरकते.
योगा
शिल्पा शेट्टी आठवड्यातील पाच दिवस कार्डियो, स्ट्रेंथ आणि योगा करते. त्यात फक्त दोन दिवस योगा आणि तीन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डियो करते.

मेडिटेशन
जरी रोज तो व्यायाम करत असली योगा झाल्यावर तरी थोडा वेळ ती मेडिटेशन साठी ही देते. जवळ जवळ 10 ते 15 मिनिट ती मेडिटेशन करते त्यामुळे तिला दिवसभराच्या थकव्यातून आराम मिळतो.
पाण्याची पातळी
आपल्या शरीरातील पाण्याची पातळी समतल ठेवण्यासाठी ती दिवसभरात दहा ग्लास पाणी पिते.
प्रोटीन शेक
शिल्पा शेट्टी रोज जरी व्यायाम करत असली तरी त्याचबरोबर तिचे खाण्यापिण्यावर ही बरेच लक्ष असते. व्यायाम आणि योगा केल्यावर ती प्रोटीन शेक घेते तिने तळलेले पदार्थ आपल्या आहारातून वर्ज्य केले आहेत कारण त्यात भरपूर कॅलरीज असतात. शिवाय ती आठवड्यातून एक दिवस बाहेरचे जेवते. ऑलिव्ह ऑइल चा जास्त वापर ती तिच्या आहारात करते.
ब्रेकफास्ट
सकाळी शिल्पा आवळा किंवा कोरफडीचा रस घेते, सकाळच्या ब्रेक फास्ट मध्ये दलिया खाते. शिवाय चहा आणि चहामध्ये ब्राऊन शुगरचा वापर करते. दुपारच्या जेवणात आपल्या सारखे साधे जेवण करते म्हणजे डाळ भात आणि चपाती, भाजी हा आहार तो नियमित करते.