शिर्डी मध्ये काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गोष्टी घडत आहेत. इथे साई दर्शनासाठी आलेले अनेक भक्त परत आपल्या घरी पोहोचले नाही आहेत. साई भक्तांचे असे अचानक गायब होण्यामुले मुंबई कोर्टाने चिंता व्यक्त केली आहे आणि पोलिसांना कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तुम्हाला जाणून धक्का बसेल मागील एका वर्षात साई नगरी मधून ८८ लोकं बेपत्ता झाली आहेत. त्यामुळे थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे का होत? कोण आहे ह्या सर्वांच्या मागे? अशी अनेक प्रश्न तेथील नागरिक आणि महाराष्ट्राच्या जनतेला पडली आहेत. म्हणून मुंबई कोर्टाने स्वतः ह्या गोष्टीत हस्तक्षेप केला आहे. लवकरात लवकर ह्या गोष्टीचा मुळापर्यंत पोहोचायचे आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेपत्ता झालेल्या मध्ये महिलांची संख्या जास्त आहे. ह्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई कोर्टाने ही केस औरंगाबाद ब्रांच कडे दिली आहे. जे ८८ लोक शिर्डी मधून बेपत्ता झाले आहेत त्यातून जास्तीच जास्त लोक हे साईंच्या दर्शनासाठी आले होते. गायब झालेल्या लोकांमध्ये स्त्रियांची संख्या जास्त असल्या कारणाने चिंतेची गोष्ट निर्माण झाली आहे. एखाद्या गरीब घरांतील व्यक्ती गायब झाला तर नातेवाईक लाचार होतात ते पोलिसांकडे जात नाहीत.
खूप कमी लोकं असतात जे कोर्टाचा दरवाजा ठोठावतात. त्यामुळे कोर्टाने ही भीती व्यक्त केली आहे की कदाचित ८८ हा आकडा फक्त समोर आला आहे ह्यवून जास्त मोठा आकडा असू शकतो. ही गोष्ट मानव तस्करी सोबत निगडित असू शकते अशी सुद्धा भीती वर्तवली जात आहे. म्हणून लवकरात लवकर एक अहमदनगर पथकाने एक स्पेशल टीम निर्माण करून ह्या गोष्टीचा लवकरात लवकर शोध घेतला पाहिजे. असे कोर्टाने आदेश दिले आहेत.
Source OneIndia