पूर्वी अनेक सीरियल होऊन गेल्या आणि त्यातील बहुतेक सीरियल ह्या प्रेक्षकांच्या मनात त्यांचं स्थान कायमच ठेऊन गेल्या. अशीच एक नावाजलेली सीरियल श्री कृष्ण या सीरियल मध्ये सर्वदमन डी बनर्जी यांनी श्री कृष्णाची भूमिका साकारली होती. लोकांनीही त्यांना खूप पसंत केले होते त्यावेळी लोक खर तर त्यांना खरोखर श्री कृष्ण मानायचे. म्हणजे लोकांच्या मनावर ह्या पात्राने राज्य केले होते त्याला तोड नव्हती. जिथं जिथं लोक त्यांना भेटायची त्यांच्या पायावर लोटांगण घालत असत इतकी लोक त्यांच्या या भूमिकेत समरस झाली होती.

त्यावेळी रविवार उजाडला की लोक सकाळ पासूनच टीव्ही जवळ बसलेले असायचे. जसे रामानंद सागर यांची श्री कृष्ण ही सीरियल चालू व्हायची तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असायचा. यातील अभिनेता सर्वदमन डी बनर्जी यांनी श्री कृष्णाच्या सीरियल शिवाय अर्जुन’, ‘जय गंगा मैया’ आणि ‘ओम नम: शिवाय’ यांसारख्या सीरियल मध्येही काम केले आहे.
त्यांनी जास्तीत जास्त सीरियल मध्ये श्री कृष्णाची भूमिका केली आहे. तसेच काही सिनेमा मध्येही त्यांनी काम केले आहे. त्यांनी शेवटचा सिनेमा एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी यात ही काम केले आहे. आता ते स्वत मेडिटेशन सेंटर चालवत आहेत शिवाय त्यांचा एक एन जी ओ सुद्धा आहे. त्यात जवळ जवळ 200 मुलांचे संगोपन केले जाते.
मागील काही वर्षात सर्वदमन डी बनर्जी यांच्या चेहरेपट्टी मध्ये खूप बदल झालेला आहे तुम्ही कदाचित आता त्यांना ओळखणार ही नाही शिवाय ते आता ग्लॅमरच्या दूनियापासून लांबच राहतात. त्यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये असे सांगितले होते की मी फक्त वयाच्या 45 ते 46 पर्यंत अभिनय करेन.