पश्चिम बंगाल: प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांनी आपल्या म्हातारपणी आधार द्यावा परंतु आजकालची पिढी कामात इतकी मग्न आहे की त्यांना आपल्या आईवडिलांकडे पुरेसा लक्ष देणे त्यांच्या हातात नसते याच संकल्पनेला आधारित अशीच एक घटना पश्चिम बंगालमधील हुगळी येथे घडली आहे. त्याने ही आपल्या आईसाठी एक निर्णय घेतला आहे तो काय आहे हे आपण पाहूया .
तर या दिवसात गौरव नावाच्या मुलाची फेसबुक पोस्ट खूप व्हायरल झाली आहे. ज्याने आपल्या आईसाठी योग्य तो वर मिळवा यासाठी याचना केली आहे. गौरव हुगली जिल्यातील फ्रेंच कॉलनी मध्ये राहणारा युवक आहे. पाच वर्षांपूर्वीच त्याचे वडील गेले त्यानंतर त्याची आई एकटीच घरात असते. यावर गौरवच म्हणणं आहे की, माझ्या पोस्ट ला बहुतेक लोक हसतील ही पण तरीही मी माझा निर्णय बदलणार नाही.
गौरव ने आपली पोस्ट लीहताना असे सांगितले आहे की, आई माझी नेहमीच काळजी करते परंतु मलाही तिच्या बाजूने विचार करायला हवंय. मी नेहमीच घराबाहेर असतो त्यामुळे आई घरात एकटीच असतें त्यामुळेच मी असा विचार केला आहे की तिचं उरलेलं जीवन हे चांगल्या पद्धतीने जायला हवेत यासाठी मी तिच्यासाठी एका चांगल्या वराच्या शोधात आहे.

त्याने त्याच्या पोस्ट मध्ये पुढे लिहल आहे की, आम्हाला रुपये पैसे, जमीन जुमला, आदींचा अजिबात हव्यास नाही आहे. त्याची एकच इच्छा आहे की आईसाठी जीवनसाथी हा स्वयंपूर्ण असावा त्याच्या आईला पुस्तके वाचायला खूप जास्त आवडते तसेच संगीत आवडते पण पुस्तके आणि संगीत हे दोन्ही मिळून एका जीवनसाथी ची जागा नाही घेऊ शकत. आईचा एकटेपणा दूर करण्यासाठी नक्कीच एका चांगल्या जोडीदाराची गरज आहे. या पोस्ट का लोकांनी भरपूर पसंत केले आहे.
0 comment
Very nice