Home बातमी एकच तर मन आहे भावा अजुन कितीवेळा जिंकणार? सोनु सूद ह्यानी मुलींना घरी पाठवण्यासाठी केलं विमान बुक

एकच तर मन आहे भावा अजुन कितीवेळा जिंकणार? सोनु सूद ह्यानी मुलींना घरी पाठवण्यासाठी केलं विमान बुक

by Patiljee
2156 views

कोरोना महामारित डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी ह्यांचे कौतुक तर होत आहेच पण सध्या एक नाव ह्याच नावांच्या सोबत चर्चेत आहे ते म्हणजे सोनू सूद. सोनूने आतापर्यंत हजारो मजूरांना स्वखर्चाने बसेस करून त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली आहे. भारतातून सर्वच ठिकाणाहून त्याचे कौतुक होतं. त्याच्या कामात अजुन एक भर पडली आहे. त्याने केरळ मध्ये अडकलेल्या १७७ मुलींना एअरलिफ्ट केलं आहे.

ह्या सर्व मुली एर्नाकुलम‌ येथील स्थानिक कंपनी मध्ये काम करत होत्या. त्यांच्याबाबत जेव्हा भुवनेश्वर इथे राहणाऱ्या त्याच्या मित्राने त्याला त्यांच्याबद्दल सांगितले तेव्हा त्याने लगेच त्यांची मदत करण्यासाठी पाऊले उचलली. त्या सर्व मुली सध्या त्यांच्या घरी सुखरूप पोहोचल्या आहेत. कोची आणि भुवनेश्वर येथील अधिकाऱ्यांशी बोलून त्यांची परवानगी घेऊन त्याने ह्या मोहिमेला सुरुवात केली होती.

बंगलोर वरून विशिष्ट अशा एअर काफ्टची व्यवस्था केली होती. सोनू ने सांगितले की लॉक डाऊन मुळे ह्या सर्व मुली केरळ मध्ये अडकल्या होत्या. पण मला आनंद आहे की माझ्यामुळे त्या त्यांच्या कुटुंबाला भेटू शकल्या.

View this post on Instagram

घर चलें❣️@goel.neeti

A post shared by Sonu Sood (@sonu_sood) on

सोनू सूद सध्या लॉक डाऊन मध्ये जे हे लोक वेगवेगळ्या प्रांतात अडकले आहेत त्यांना घरी नेण्यासाठी मदत करत आहे. ह्यासाठी त्याने एक टोल फ्री नंबर सुद्धा सुरू केला आहे. ट्विटर वर सुद्धा त्याने अनेक मजुरांसोबत कॉन्टॅक्ट साधला आहे.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल