Home करमणूक ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेमधील कलाकाराने मागितली माफी, मराठी भाषे दरम्यान वाद

‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेमधील कलाकाराने मागितली माफी, मराठी भाषे दरम्यान वाद

by Patiljee
391 views

मित्रांनो काही दिवसांपूर्वीच मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला ही मराठी भाषा संपूर्ण महाराष्ट्राची मातृभाषा आहे म्हणजेच मुंबई ही सुद्धा महाराष्ट्राची राजधानी आहे आणि तिथेही मराठी भाषा हीच बोलायला हवी. पण सध्या तरी या भाषेवरून वाद चालू आहेत ते म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा या मालिके दरम्यान आणि हा वाद सोशल मीडियावर ही आपल्याला पाहायला मिळत आहे.

या मालिकेमध्ये एका डायलॉग वरून हा वाद झाला आहे आणि म्हणूनच मराठी माणसाच्या हितासाठी नेहमी लढा देणारा मनसे हा याविरोधात जाऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या महाराष्ट्राची भाषा मराठी तसेच मुंबईची सुधा मराठी भाषा मातृभाषा असणार पण या मालिकेमध्ये हिंदी या भाषेला मुंबईची भाषा आहे असे बोलण्यात आले आहे. या डायलॉग वरून लोकांमधे ही नाराजी पाहायला मिळते आहे. यादरम्यान मनसेचे फिल्म स्टाफचे चेयरमेन अमेय खोपकर यांनी या सीरियल बद्दल आणि त्यातील कलाकार यांच्यावर टीका केली आहे.

अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करताना ट्विट केले आहे. ट्विट करताना ते म्हणतात की, ह्या मालिकेच्या निर्मात्याला माहीत आहे की मुंबईची मातृभाषा ही मराठी आहे तरीही त्याने हे असे डायलॉग मालिकेमध्ये बोलायला लावणे हे चुकीचे आहे. आणि म्हणून या चुकी साठी त्यांना माफ न करणे शिवाय यातील मराठी कलाकार ही काम करत आहेत पण त्यांनाही यात काहीच चुकी वाटत नाही ही खरोखर शरमेची गोष्ट आहे.

याशिवाय जनरल सेक्रेटरी शालिनी ठाकरे यांनीही या प्रकरणात हात घातला आहे. त्यांनी आपले खडतर वाक्य बोलताना व्हिडिओ शेअर केला आहे. त्या सांगतात की मुंबईची भाषा हिंदी नाही मराठी आहे जर या टीव्ही वाल्यांना ते माहीत नसेल तर मनसेच्या सैनिक त्यांच्या कानाच्या खाली सुविचार लिहायला लागतील ते ही मराठीत.

यांदर्म्यान या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी आपले वक्तव्य स्पष्ट केले आहे ते म्हणतात की आपण सर्व भारतीय आहोत पण मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि म्हणून मुंबईची भाषा मराठी आहे, मी सर्व भाषेचा आदर करतो. तसेच या मालिकेतील बाबूजी हे कॅरेक्टर करणारे अभिनेते अमित भट्ट यांनीच हे डायलॉग म्हटलं होत. त्यामुळे त्यांनीही एका न्युज चॅनल शी बोलताना माफी मागितली आहे. आणि ही अशी चूक पुन्हा होणार नाही असेही म्हटले आहे त्यांनी माफीनामा ही दिला आहे.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल