Home कथा ती मी आणि ती

ती मी आणि ती

by patiljee
16460 views

आज तिच्या हळदीत जाऊन मस्त ताव मारून आलो. सोबत चार पाच मित्रांना घेऊन मस्त मटणावर ताव मारला. खूप खुश होतो असे मित्रांना तरी वाटत होतं. पण माझ्या अंतरमनात उठलेल्या सागराबद्दल सर्वच अजाण होते. आज तिची हळद होती. तिची म्हणजे माझ्या दिपालीची. दिपाली आणि मी इयत्ता पाचवी पासूनचे सोबती होतो. आधी दुष्मणी मग हळुवार फुलणारी मैत्री आणि नंतर जीव ओवाळून टाकणारे आमचे प्रेम. असा आमचा प्रवास सुरू झाला होता. आमचे एकमेकावर पाच वर्षापासूनचे प्रेम होते.

पण म्हणतात ना जास्त वेळ सोबत असलो की आपण आपल्याच व्यक्तीला गृहीत धरायला लागतो. माझेही तेच झाले. आम्ही एवढे एकेमकांच्या जवळ होतो की लग्नाची सर्व स्वप्न सुद्धा पाहिली होती. आपल्याला पहिले बाळ तुझ्यासारखी गोंडस मुलगीच हवी. इथपर्यंत आमच्या गोष्टी पोहोचल्या होत्या. पण कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला जे व्हायला नको होते तेच झाले. अपूर्वाने ह्या वर्षाला आमच्या वर्गात प्रवेश घेतला होता.

अपूर्वा…. छान उंच, दिसायला देखणी, काळेभोर केस, मधेच थोडे कलर केलेले, उंच टाचेच्या चपला, डार्क लिपस्टिक, अगदी चार चौघात उठून दिसेल अशीच होती ती, सर्वानाच कॉलेजमध्ये ती आवडू लागली होती. तिची गोष्ट काय वेगळी होती. म्हणून मी ही तिच्याकडे कधी ओढला गेलो माझे मलाच कळले नाही. मी दिसायला देखणा असल्याने मी काहीच महिन्यात तिला पटवले. माझे दिपाली सोबत प्रेम प्रकरण चालू असताना देखील मी अपूर्वाच्या मागे लागलो होतो.

एकाच दगडावर पाय न ठेवता मी दोन्ही दगडावर पाय टाकले होते. माझे दिपाली सोबत असलेले नाते हळूहळू कमकुवत होत चालले होते. ह्याला जबाबदार मीच होतो कारण आता मी तिला पुरेसा वेळ देत नव्हतो. माझे सर्व लक्ष अपूर्वाकडे असायचे. ती माझी प्रेयसी आहे हे सर्व कॉलेजमध्ये कळले होते. एवढी सुंदर मुलगी ह्याने पटवली तरी कशी म्हणून संपूर्ण कॉलेजमध्ये माझा वेगळा रुबाब निर्माण झाला होता. दिपालीच्या कानावर पण ह्या गोष्टी आल्या होत्या पण तिला माझ्यावर पूर्ण विश्वास होता.

पण तिचा विश्वास तेव्हा तुटला जेव्हा गर्ल्स टॉयलेट मध्ये तिने आम्हाला किस करताना पकडले. तेव्हा एक तिष्ण कटाक्ष माझ्याकडे टाकला. मी कळून चुकलो होतो की आता ही माझ्या कानाखाली खेचणार पण तिने असे काहीच केले नाही. ती तिथून शांतपणे निघून गेली. तेव्हा पासून तिने माझ्याशी बोलणे टाकून दिले. मी ही तिच्याशी त्या दिवसापासून कधीच बोलायला गेलो नव्हतो. कॉलेजची सर्वात सुंदर मुलगी माझी प्रेयसी आहे मला अजुन काय हवं म्हणून मी खुश होतो.

अपूर्वा आणि माझ्यात शारीरिक संबंध सुद्धा आले. मलाच ते हवं होते पण माझ्या अगोदर तिने ह्या गोष्टीची मागणी माझ्याकडे केली. मी खुश तर होणारच होतो. मग काय दोन तीन वेळा आमच्या संबंध झाले. पण नंतर ती मला इग्नोर करू लागली. दुसऱ्या मुलांना वेळ देऊ लागली. मला कळत नव्हते ती अशी का करतेय? माझ्या मेसेजला रिप्लाय येणे बंद झाले, कॉल ब्लॉक लिस्टमध्ये टाकला. एक दिवस मी तिला समोर जाऊन ह्या गोष्टीचा जाब विचारला. तर तिने मला हसत उत्तर दिले.

आपल्यात जे झाले तो फक्त निव्वळ टाईमपास होता. आणि तसेही तुझ्यात एवढा दम नाही की तू कुणा मुलीला तृप्त करू शकतोस. नामर्द आहेस तु, त्यामुळे तुझी लायकी नाही माझ्यासोबत राहण्याची. तिचे हे शब्द वार माझ्या काळजात आघात करत होते. आजवर मी दिपाली सोबत सुद्धा अनेकवेळा संबंध ठेवले होते पण तिने कधीच मला असे काही बोलले नव्हते. हिने तर सर्वासमोर मला नामर्द हा शिक्का लावला. तेव्हापासून मला शाळेत सर्व नामर्द म्हणून चिडवू लागले.

दिपालीची खूप जास्त आठवण येत होती. एका अशा मुलीसाठी मी तिला सोडले होते जिला फक्त माझा सहवास हवा होता. मी दिपालीची माफी मागण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने माझ्याशी बोलणे योग्य समजले नाही. तिचेही वागणे बरोबर होते. कारण ह्या अगोदर मी कधीच तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला नव्हता. नंतर मला कळलं माझाच गुलशन नावाचा मित्र त्याने तिला ह्यातून बाहेर पडायला खूप साथ दिली. आज ते दोघे एकेमावर प्रेम करू लागले होते. माझ्या हातात काहीच उरले नव्हते. फक्त उरल्या होत्या त्या कधी न विसरता येणाऱ्या आठवणी.

दिपालीवर माझे खूप प्रेम होते, पण माझ्या एका चुकी मुले एवढे सर्व मी गमावून बसलो. आज तिच्या हळदीत सुद्धा ह्यासाठी आलो होतो जेणेकरून तिला आनंदात पुन्हा एकदा पाहता येईल. पण खरंच ती गुलशन सोबत खूप खुश होती. म्हणूनच तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप बरं वाटतं होतं पण दुःख ह्याच गोष्टीचे होते आनंदाचे कारण मी होऊ शकलो नाही.

लेखक : पाटीलजी

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: Content is protected !!