Home हेल्थ टोमॅटो रोजच्या भाजीत आपण वापरतो जाणून घ्या त्याच्या बद्दल अजून बरच काही

टोमॅटो रोजच्या भाजीत आपण वापरतो जाणून घ्या त्याच्या बद्दल अजून बरच काही

by Patiljee
387 views

टोमॅटो रोजच्या जेवणात वापरला जाणारी हो फळभाजी आहे, त्याच्याशिवाय भाजीला चवच येत नाही. त्यामुळे टोमॅटो कितीही महाग झाला तरी तो खायला तर पाहिजेच. काही लोक सलाडमध्ये याचा जास्त उपयोग करतात तर काही टोमॅटोचा सार बनवून खातात. तर काहीना टोमॅटोची चटणी खूप आवडते. टोमॅटो हे नाव पहिल्यांदा अमेरिका मध्ये पाहायला मिळाले तर भारतात हे फळ आले तेव्हा त्यास विलायती वांगे असे म्हटले जात होते.

आफ्रिकेच्या जंगलात ही काळया रंगाचे टोमॅटो उगवतात. त्याला काळे जाम असे म्हणतात. अमेरिकेत मेक्सिकोमध्ये जेव्हा हे फळ पहिल्यांदा खाल्ले गेले, तेव्हा त्याला लव अॅपल असे म्हटले गेले आहे. टोमॅटो हा आज कुठल्याही घरात नेहमीच आढळणारा आहे. टोमॅटोचा वापर कुठलीही भाजी, कोशिम्बीर, चटणी यात सर्रास केला जातो आहे. विविध पदार्थांना स्वाद देणारा टोमॅटो कच्चाही खाल्ला जातो. त्यात अनेक प्रकारची जीवनसत्वे, खानेजे, अँटी ऑक्सिडन्ट, फायबर भरपूर प्रमाणात आहेत. रक्तशुद्धी, हृदय विकार, कोलेस्टेरॉल नियंत्रण, दृष्टी चांगली राखण्यासाठी, शरीरातील विषारी तत्वे बाहेर टाकण्यासाठी टोमॅटोचे नियमित सेवन उपयुक्त ठरते.

भारतामध्ये ही फळभाजी म्हणून ओळखली जाते आणि तिला टोमॅटो असे म्हणतात. महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये टोमॅटोची लागवड केली जाते. तसेच टोमॅटो हा प्रत्येक हंगामात येणारा पीक आहे. त्यामुळे याचे उत्पादन ही खूप येते. टोमॅटो या फळभाजी मध्ये कैल्शियम, फास्फोरस व विटामिन सी हे घटक मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. त्याचप्रमाणे यात लोह, फॉस्फरस ‘क’ हे पोषक घटक ही आढळतात. याची चव आंबट असते.

याचे कारण यांच्यामध्ये साइट्रिक एसिड आणि मैलिक एसिड असते. तसेच यात असणारे मोठ्या प्रमाणात अ जीवनसत्व असतात. यामुळे टोमॅटो हे आपल्या डोळ्यांसाठी खूप उपयुक्त असे फळ आहे. काविळीत टोमॅटोचा रस उपयुक्त असतो. तसेच वजन नियंत्रणात राहण्यासाठी टोमॅटो उपयोगी पडतो. टोमॅटो खाल्याने पोट भरलेले राहते. त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब आणि मधुमेह या आजारांवर ही टोमॅटो खाल्याने फायदा मिळतो. शिवाय कॉलेस्ट्रॉल ही नियंत्रणात राहते.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल