मित्रानो कासव हा प्राणी अत्यंत शांत मानला जातो त्यामुळे आपल्यातील काही लोक हे कासव पाळण्यात अग्रेसर असतात. तर जमिनीवर राहणारा कासव आणि पाण्यात राहणारा कासव या दोघांमध्ये खूप फरक आहे त्याच्या आवडी निवडी ही वेगवेगळ्या असतात आणि त्या आपल्याला माहीत नसतात. आता जमिनीवरचे कासव हे काहीही खाऊ शकतात म्हणजे भाज्या किंवा कच्चा गवत वगैरे पण पाण्यात राहणारा कासव हा फक्त मांसाहारी असतो तो फक्त पाण्यातील मासे खात असतो. जे कासव जमिनीवर राहतात आणि तुम्ही जर ते आपल्या घरात आणून पाळले असेल तर त्याला खाण्यासाठी कोरड्या भाज्या द्यावा. म्हणजेच भेंडी आणि भोपळा यांसारख्या पाणीदार भाज्यानी कासवाचे पोट हे बिघडते.

जर तुम्ही पाळत असलेले कासव पाण्यातील असेल तर त्या कासवास छोटे मासे किंवा मांसाचे तुकडे खायला द्यावेत. त्याचप्रमाणे बाजारातही या कासावांसाठी अन्न मिळते ते दिले तरीही चालते. कासवाच्या शरीरातिला रक्त हे नेहमी थंड असते त्यामुळे शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी तसेच रक्ताभिसरण ही चांगल्या प्रकारे होण्यासाठी त्याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते ते ही चार ते पाच तास जर कासव यास सूर्यप्रकाश मिळाला नाही तर तो आजारी पडू शकतो आणि त्यातून कदाचित त्यांचा जीव ही जाऊ शकतो.
कासव हे अख्खा दिवस पोहत नसतात तर काही वेळ त्यांना पाण्याबाहेर येऊन दगडावर राहणे योग्य असतें. त्याचप्रमाणे भारतीय तारांकित कासव किंवा टेंट या जातीतील कासव घरी पाळल्यास कायद्याने गुन्हा आहे आणि त्यासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. पण मूळ भारतीय नसलेल्या यांच्या प्रजाती तुम्ही पाळू शकता.