तुम्ही सुद्धा आयुष्यात कधी ना कधी ट्रेनने प्रवास नक्कीच केला असेल. सर्वात जलद प्रवास म्हणून नेहमीच ट्रेनची ओळख आहे. भारतातील बहुसंख्य लोक ट्रेनने प्रवास करतात. आपल्या महाराष्ट्राची मुंबई लोकल ट्रेन तर जगविख्यात आहे. ह्याच ट्रेनने अनेक लोकांना रोजीरोटी देण्याचे काम केलं आहे. जेव्हा तुम्ही ह्याच लोकल ट्रेनमध्ये बसून प्रवास करता तेव्हा तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे की ह्या ट्रेनचे जे इंजिन आहे ती किती एव्हरेज देत असेल. म्हणजे जसी आपली बाईक किंवा गाडीचे तुम्ही एव्हरेज काढले असेल तसेच ट्रेनचे किती असू शकते ह्याचा अंदाज तुम्ही लावला आहात का?

आपण फक्त प्रवासासाठी ट्रेनचा वापर करतो पण एव्हरेज चा विचार कधी केलाच नसेल. आज आम्ही तुम्हाला सागणार आहोत की ट्रेन एक किलो मिटर साठी किती इंधनाचा वापर करते. डिझल इंधनाला त्याच्या क्षमतेनुसार तीन टप्प्यात विभागले आहे. ५००० लिटर, ५५०० लिटर आणि ६००० लिटर. ऑनलाईन मिळालेल्या माहितीच्या रिपोर्ट नुसार २४ डब्ब्यावली ट्रेन ६ लिटर इंधनात एक किलो मीटरचा प्रवास करते. एक्स्प्रेस गाडीचा मायलेज ४.५ लिटर इंधनात एक किलो मीटरचा प्रवास होतो.
प्रति किलो मीटरचा एव्हरेज कधी कधी वेगळा सुद्धा असू शकतो कारण गाडीवर किती वजन आहे हे इंजिनचे एव्हरेज ठरवते. मालगाडी आहे की पेसेंजर गाडी आहे ह्यावर सुद्धा मायलेज अवलंबून असतो. आपली लोकल ट्रेन ही इलेक्ट्रिसिटी वर चालते. कदाचित काही लोकांना ही बातमी अफवा वाटेल पण ही बातमी खरी आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही गुगल करू शकता.