मित्रानो या समाजात राहणारा प्रत्येक व्यक्तीला राग हा येतोच येतो कारण ती एक प्राकृतिक भावना आहे. जसे व्यक्तीला सुख आणि दुःख या भावना असतात त्याचप्रमाणे राग ही असतो पण प्रत्येक व्यक्ती नुसार कमी जास्त प्रमाणात असतो. कोणाला थोड्याशा कारणावरून लगेच राग येत असतो तर काही लोकांना हाच राग प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर येतो. पण राग हा प्रत्येक व्यक्तीने कंट्रोल करायला हवा म्हणत नाही नेहमीच तसे करावे पण जेव्हा कंट्रोल करायला जमत असेल तेव्हा नक्की करावे. कारण हाच राग आपला नेहमी घात करत असतो. मानसिक दृष्ट्या ही आणि सामाजिक दृष्ट्या ही राग हा माणसाला लयाला नेणारा आहे.
तुम्हाला जेव्हा राग येतो तेव्हा गप्प बसा आणि आपल्या मनातील ज्या काही गोष्टी असतील त्या मित्रांसोबत शेअर करा. त्यामुळे नक्कीच तुमचा राग थोडा तरी कमी होईल. कधी कधी खूप राग आल्यावर तुम्ही 1ते 100 पर्यंत आकडे मोजा.
जास्त राग आल्यास आपण आपल्या आवडत्या ठिकाणी फिरायला जावे किंवा आवडते गाणे ऐकणे, शिवाय आवडते पुस्तक ही तुम्ही वाचू शकता. त्यामुळे तुमचे मन राग विसरून जाईल.
नियमित योगा करा त्यामुळे तुमच्या मनाला एकप्रकारची शांती मिळेल. शिवाय खूप जास्त राग आला असेल तर लगेच तोंडावर थंड पाणी मारा.
एकटे कधी राहू नका त्यामुळे राहून राहून काही गोष्टी तुमच्या मनात सतत येत राहतात आणि त्यामुळे तुमचा राग वाढण्यास मदत होते म्हणून मित्रपरिवार सोबत रहा.
समोरच्या व्यक्तीचे म्हणणे पूर्णपणे ऐकुन घ्या. त्या व्यक्तीला आपल्या जागेवर आणून पाहा. आपण त्या ठिकाणी असतो तर काय केले असते ही जाणीव करा.
हे ही लक्षात असू द्या की जास्त राग हा माणसाला मानसिक दृष्ट्या ही घातक आहे यामुळे तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात. शिवाय बीपी सारखा घातक आजार ही होऊ शकतो, झोप न येणे यांसारखी लक्षणे पुढे जाऊन आढळतात. रागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा. माहीत आहे ही खूप कठीण गोष्ट आहे पण प्रयत्न करा. कारण तुम्ही आजूबाजूला बरीच अशी उदाहरणे पाहिली असतील ज्यामुळे थोड्या वेळाच्या रागाने त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले.
3 comments
[…] ज्यांना मानसिक त्रास होतो किंवा जे डिप्रेशनचे शिकार झाले आहेत अशांनी रोज केळ्यांचे सेवन […]
[…] ज्यांना मानसिक त्रास होतो किंवा जे डिप्रेशनचे शिकार झाले आहेत अशांनी रोज केळ्यांचे सेवन […]
Thank you for the auspicious writeup. It in fact was a
amusement account it. Look advanced to more added agreeable from you!
By the way, how can we communicate?