Home हेल्थ कोणत्याही कारणाने तुमच्या शरीरावर भाजले असे तर हे घरगुती उपाय करून आराम मिळवा

कोणत्याही कारणाने तुमच्या शरीरावर भाजले असे तर हे घरगुती उपाय करून आराम मिळवा

by Patiljee
537 views

कधी कधी जेवण करताना घरातील महिलांचा हाताला चटके बसतात तर कधी लहान मुलांना आगीशी खेळताना, कधी गरम पाणी पडल्याने किंवा पेटल्याने वा गरम भांड्याला हात लागल्याने आपल्याला भाजले जाते. भाजल्यामुळे जखमही होतात अशारीतीने घरातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणाने असे अपघात होणे हे आपल्या हातात नसते पण या अपघातानंतर प्रार्थामिक उपाय करणे ही तुमची जबाबदारी असते. आणि म्हणून आपल्या घरात जर कोणाला भाजले तर कोणते उपाय आपण करी शकतो ते पाहूया.

भाजलेल्या ठिकाणी लगेच थंड पाणी टाका अशा वेळी बर्फ वैगेरे अजिबात ठेवू नका किंवा फडका ओला करून तो जखमेवर लपेटा. त्यामुळे जखम चिघळणार नाही किंवा एका भांड्यात पाणी घेऊन त्या भांड्यात भाजलेला भाग बुडवा तुम्हाला लगेच आराम मिळेल.

एक महत्त्वाची गोष्ट आपल्या घरात नेहमी फर्स्ट एड बॉक्स असायला हवा जेणेकरून लगेच उपाय करता येतील. त्यात एक बर्नोलची ट्यूब असावी जेणेकरून भाजल्यावर तिथे लावायला बरे पडते.

भाजलेल्या ठिकाणी फोड आलेला असेल तर तो लगेच फोडू नये. कोडफड ही थंड असते त्यामुळे भाजलेल्या ठिकाणी कोडफडीचा गर काढून तो लावावा त्याने लगेच आराम मिळेल.

आपल्या घरातील बटाटा हा ही यासाठी वापरला जाऊ शकतो. बटाट्याचे काप करा आणि ते जखमेवर ठेवा. थंड पाण्यात ठेवलेली टी बॅग जखमेवर ठेवा त्यात टैनिक आम्ल असते त्यामुळे जखम लवकर भरून येण्यास मदत होते.

अचानक हाताला तव्याचा किंवा इतर वस्तूचा चटका बसला असेल तर त्या ठिकाणी लगेच मीठ चोळा त्यामुळे त्या ठिकाणी फोड येणार नाही. किंवा खायचा सोडा टाका त्यामुळे जळजळ होत नाही आणि फोड ही येत माहीत. शिवाय हळद ही लावू शकता त्यामुळे ही इन्फेक्शन होण्याचा धोका टळतो.

अशा रीतीने तुम्ही तुमच्या घरात कोणाला भाजल्यास त्यावर प्राथमिक उपचार घरीच करू शकता.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल