पाहिले तर मुलीचे लग्न होणे ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि आनंद देणारी अशी गोष्ट असते. पण जर का याच लग्न झालेल्या मुलीच्या संसारात जर का घटस्फोट सारखा विष उत्पन्न झाला तर समजून जा की तिचा संसार आता डोलायला लागला आहे. सतत भांडण, मानसिक छळ या सगळ्या गोष्टींमुळे कदाचित मुलगी हा घटस्फोटाचा निर्णय घेतेही पण घटस्फोट झाल्यानंतर काय? हा प्रश्न हि तिच्या समोर वारंवार उभा राहत असतो. शिवाय लोकांचा घटस्फोट झालेल्या मुलीकडे पाहण्याचा दृष्टीकोन ही वेगळा असतो. जर घटस्फोट झाला तर तिला आपल्या आई वडिलांवर अवलंबून राहावे लागते आणि म्हणून काही महिला या घटस्फोट घेण्यापासून लांबच राहतात.
कारण त्यांना या सगळ्या गोष्टींपासून लांब राहायचे असते लोकांच्या नजरेला नजर द्यायची असते आणि म्हणून संसारात इतका त्रास होत असतानाही स्त्री घटस्फोट घेत नाही. म्हणून कदाचित आपल्या भारतात इतर देशापेक्षा घटस्फोटाचे प्रमाण कमी आहे. ही कदाचित एक चांगली गोष्ट असू शकते पण कदाचित घटस्फोट न घेतल्यामुळे कितीतरी स्त्रियांच्या बाबतीत त्याहीपेक्षा अधिक वाईट घडले असल्याची बातमी आपल्या कानावर अनेक वेळा येते आणि म्हणून या सगळ्यांपेक्षा घटस्फोट हा कदाचित उत्तम मार्ग ही असू शकतो या सगळ्यांपासून लांब राहण्याचा.
तुमच्यावर कडे सतत पैशाची मागणी होत असेल
मित्रानो तुम्हाला माहीतच आहे की आपल्या देशात लग्नासाठी हुंडा घेणे आणि हुंडा देणे ही प्रथा आता ही प्रथा राहिलेली नाही शिवाय कायद्याने ही हा गुन्हा आहे पण ह्या कायद्याला न जुमानता काही लोक लग्न झालेल्या मुलीला माहेरहून पैसे आणायला सांगतात आणि तिच्या माहेरचे लोक ही इकडून तिकडून गोळा करून पैसे जावयाच्या हातावर ठेवतात पण हाच विषय एकदा झाल्यावर संपतो का? तर नाही ज्या लोकांना अशा प्रकारच्या पैशाची सवय लागलेली असते ती लोक सतत पैसे मागतात आणि मग यापुढे जाऊन याचे परिणाम वाईट होऊ शकतात आणि स्त्रीला या सगळ्याचा दोषी मानले जाते. यासाठी स्त्रियांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय उचित आहे.
घरात होणारा अत्याचार
लग्न झाल्यानंतर काही दिवसातच त्या स्त्री विषयी घरातल्यांचा व्यवहार बदलणे ही घटस्फोटासाठी योग्य वेळ आहे. म्हणजे त्या स्त्रीवर घरातील लोक मग ते कोणीही असो शारीरिक किंवा मानसिक अत्याचार करीत असतील. तिला प्रत्येक कारणावरून मारझोड केली जात असेल तर जमजून जा तुमचा संसार आता धोक्यात आहे आणि यापुढे जाऊन तुम्ही योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे नाहीतर याचे परिणाम वाईट होऊ शकतात.
नवऱ्याच्या बाहेर संबंध
लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये निखळ प्रेम असायला हवं पण जर का नवरा लग्न झालेल्या बायकोकडे बायको सारखा पाहत नसेल तिच्यावर प्रेम करत नसेल किंवा त्याला तिच्यात अजिबात इंटरेस्ट नसेल तर समजून जा या नवऱ्याचे बाहेर नक्की काहीतरी आहे. घरातल्यांच्या दबाव मुळे त्याने जरी लग्न केले असले तरीही एका मुलीचे आयुष्य त्याने उध्दवस्त केलेले असते. याचीही त्याला जान नसते. कधी कधी काही पुरुष घरात ही आणि बाहेर ही त्यांचे संबंध ठेवतात आणि हे जर त्या बायकोला समजले तर तिने त्यावेळी त्याच्यापासून वेगळे व्हायला हवे.
तुमचे नाते टिकण्यासाठी नात्यामध्ये विश्वास , भरवसा, प्रेम आणि आनंद असायला हवा तरच तुमचे नाते शेवटपर्यंत टिकू शकते नाहीतर तुमच्या नात्यात यांपैकी काहीच नसेल तर मात्र तुमचा संसार डगमगत आहे असे समजून तुम्ही यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेणे उचित ठरेल.