Home हेल्थ तुम्हाला हा प्रश्न नेहमीच पडत असेल ते म्हणजे आपल्या शरीरासाठी फळे उत्तम की फळांचा रस?

तुम्हाला हा प्रश्न नेहमीच पडत असेल ते म्हणजे आपल्या शरीरासाठी फळे उत्तम की फळांचा रस?

by Patiljee
82 views

फळ हे आपल्या आरोग्यासाठी कधीही उत्तमच असते हे आपल्याला माहीत आहेच. आजारी असणाऱ्या रोग्यासाठी ही आपण नेहमी फळ घेऊन जात असतो. कारण फळामध्ये असे काही गुणधर्म असतात की त्यामुळे रोग्यास ताकद मिळते. आताच्या काळात माणसाचे जीवन इतके गतीमय झालेले आहे की त्याला फळ खायला वेळ नसतो पण हा त्यापेक्षा ज्युस पिणे त्याच्यासाठी उत्तम ठरते. कारण ज्युस पिण्यासाठी काही सेकंद लागतात तर फळ खाण्यासाठी जास्त वेळ जातो. पण तुम्हाला माहीत आहे तज्ज्ञांच्या मते ज्युस पिण्यापेक्षा आपल्यासाठी फळ खाणे हे जास्त उत्तम आहे.

ज्युस पिताना आपण त्यातील फक्त रस पितो बाकीचे सर्व टाकले जाते पण फक्त त्यातील रस आपल्यासाठी उपयोगी नसते तर जो चोथा म्हणून टाकला जातो तो ही खूप उपयोगी असतो. ज्युस बनत असताना त्यातील तंतुमय पदार्थ फेकले जातात. शिवाय ज्युस पिताना तो आपण पटकन पितो त्यामुळे त्यात आपल्या तोंडातील लाळ जास्त प्रमाणत मिसळली जात नाही. जितकी लाळ अन्नात जास्त मिसळते तिथे अन्न पचायला सोपे जाते, फळ खाताना आपण हळू हळू चाऊन खातो त्यामुळे त्यात लाळ भरपूर प्रमाणत मिसळते.

आपण बाहेर फिरत असताना नेहमी तहान लागल्यावर बाजारात उपलब्ध असणारा फळांचा रस पितो पण हा बाजारातील फळांचा रस पिणे कधीही घातक असते. त्यात भेसळ केली जाते. शिवाय स्वच्छता ही नसते त्यामुळे बाहेर फळांचा रस पिणार असाल तर सावधानता बाळगा.

सकाळी तुम्हाला फळांचा रस पिण्याची सवय असेल तर त्यात साखर अजिबात टाकू नका आणि तो गाळून न घेता तसाच घ्या आणि तोडी मिरपूड टाका हा रस घेतल्याने उत्तम.

फळे खाण्याची योग्य वेळ ही सकाळची असते. सकाळी रिकाम्या पोटी फळे खाल्ल्याने शरीरातील पचनक्रिया फळातील ग्लुकोजचे वेगाने विघटन होते.त्यामुळे शरीराला फळातील पोषक तत्वाचा फायदा होतो.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल