Home हेल्थ तुमच्याही हातापायाला मुंग्या येतात का? का येतात माहीत आहे का?

तुमच्याही हातापायाला मुंग्या येतात का? का येतात माहीत आहे का?

by Patiljee
1671 views

हातापायाला मुंग्या येणे ही आपल्या रोजच्या जीवनातील एक समस्या आहे. तस म्हणायला गेलो तर या हाताला किंवा पायला मुंग्या आल्यावर आपली जी काय अवस्था होते ती बघण्यासारखी असते. त्या जागी कोणी स्पर्श ही करता कामा नये नाहीतर त्याचा हास्यास्पद त्रास आपल्याला होतो. शिवाय एकदा मुंग्या आल्या की हात आणि पाय एका जागेवरून अजिबात हळलू शकत नाही. आता मुंग्या येणे म्हणजे खरोखर आपल्या हातावर आणि पायावर मुंग्या चढतात. अशातला भाग नाही तर एखादा भाग काही काळ झिणझिण्या येऊन सुन्न पडतो.

आता त्या भागावर मुंग्या का येतात हे आपण बघुया. कधी कधी आपण काही काम करत असतो त्यामुळे एकाच अवयवावर सतत भार असतो. त्यामुळे त्या भागातील शिरेवर दाब आल्याने हा प्रकार आपल्याला होतो. म्हणजेच काय तर जेव्हा शरीराच्या एखाद्या भागात शिरे मार्फत रक्त पुरवठा थांबतो त्यामुळे त्या भागात मुंग्या येतात.

नेहमी ही समस्या होत असेल तर यासाठी काही घरगुती उपाय ही करावे, जेणेकरून तुम्हाला बरे वाटेल. यासाठी काय करावे तर सकाळी सौचाला जाऊन आल्यावर दोन लसूनाच्या पाकळ्या चाऊन खाव्या किंवा जायफळ चावून खावा. यामुळे तुमच्या शरीरातील रक्ताचा पुरवठा योग्य रीतीने होतो. शिवाय तूप थोडे गरम करा आणि झोपण्याच्या वेळेस तळ पायांना चोळा यामुळे ही तुम्हाला फरक जाणवेल.

काही लोकांना ह्या मुंग्या सतत येत असतात. त्यांच्या हाताला पायाला याचा नेहमी त्रास होत असतो. त्यासाठी आपल्या शरीरात काही गोष्टींची कमतरता आहे हे जाणून घ्या आणि तुम्हालाही तसे होत असेल तर लक्ष द्या. कधी कधी आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता जाणवते आणि यामुळे आपल्या शरीराला मुंग्या येतात. शिवाय यासोबत आणखी ही काही समस्या जाणवतात त्या म्हणजे थकवा आल्यासारखे वाटणे किंवा आळस येणे.
शिवाय असे काही आजार आहेत त्यामुळे ही तुमच्या हाताला आणि पायाला मुंग्या येऊ शकतात असे काही असेल तर नक्की डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ज्या लोकांना मधुमेह आजार आहे त्या लोकांना हाताला आणि पायाला मुंग्या येणे ही नेहमीची समस्या आहे. यासाठी योग्य ते उपचार घेणे गरजेचे आहे. प्रत्येकजण जॉब करतो आणि ते करणे गरजेचे आहे. त्यासाठी काही लोकांना दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करावे लागते किंवा कॉम्पुटरवर सतत एका ठिकाणी हात आणि बोटे ठेऊन ही त्यांना मुंग्या येतात. अशा वेळेस आपण थोडा वेळ आपल्या शरीरासाठी द्यावा थोडा वेळ उठून हात पाय हलवावे थोडा व्यायाम करावा.

शिवाय ज्या लोकांना थायरॉईझम हा त्रास आहे त्यांनाही हाताला आणि पायाला मुंग्या येणे ही समस्या जाणवते.

Please follow and like us:

Related Articles

1 comment

satish tapase May 4, 2020 - 2:42 am

very good

Reply

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल