Home संग्रह मखाना कसा बनतो माहीत आहे का? बघा किती मेहनत घ्यावी लागते बनवण्यासाठी

मखाना कसा बनतो माहीत आहे का? बघा किती मेहनत घ्यावी लागते बनवण्यासाठी

by Patiljee
2070 views

भारतातील सगळ्याच भागात खाल्ला जाणारा मखाना आपल्या शरीरासाठी एक उत्कृष्ट असं हेल्दी खाद्य आहे. तुम्ही कधी खाल्ला आहे का मखाना? याला कमलाच्या बिया असे म्हणतात. याच्या फळाला येणाऱ्या बियाचां आयुर्वेदिक औषधांमध्ये तसेच चायना मधील ट्रेडिशनल औषधामध्ये याचा उपयोग केला जातो. यांची निर्मिती भारतात बिहार, रशिया, कोरिया, जपान इत्यादी ठिकाणी केली जाते. पण ह्याच्यात सर्वात जास्त म्हणजे जवळ जवळ 90 टक्के निर्मिती ही बिहार मध्ये केली जाते. यांच्या निर्मितीसाठी पाण्याची जास्त गरज असते. यासाठी तलावांमध्ये ही शेती केली जाते.

Source Google

हे करत असताना कोणताही केमिकल वापरत नाहीत तर पूर्णपणे ऑरगॅनिक अशी ही शेती केली जाते. मखाना दिसायला तसे लहान असतात पण हे बनवण्यासाठी लागणारी प्रक्रिया खूप मोठी आणि कठीन असते. आता मखाना तयार कसा करतात तर याची शेती डिसेंबर ते जानेवारी यांदर्म्यांन केली जाते. त्यानंतर एप्रिल महिन्यात कमळाची फुले पाण्यावर तरंगताना दिसतात या झाडाला लागणारी फळे ही काटेरी असतात. या झाडाला लागणाऱ्या फलातुंन बी काढला जातो आणि तो सुकावला जातो. उन्हात सुकावल्यानंतर त्यामध्ये फक्त 25 टक्के ओलावा राहतो. त्यानंतर त्यातील मऊपणा तसाच टिकून राहण्यासाठी त्यावर पाणी शिंपडले जाते. हे काळे दाने संपूर्णपणे सफेद होण्यासाठी ते गरम तव्यावर भाजतात आणि नंतर लाकडाने एक एक दाना सोलून काढतात. तुम्हाला माहीत का इतकी मोठी प्रोसेस केल्यानंतर यातील फक्त 1/3 मखाना हातात मिळतात.

कसा करायचा याचा उपयोग
काही लोक उपवासाला मखाना खातात तर काही पूजा, व्रत या वेळी ही खातात काही तर रोजच आपल्या आहारात याचा उपयोग करताना दिसतात. मखाना मध्ये भरपूर प्रमाणत औषधी गुण असतात. यात प्रोटीन, एंटीऑक्सीडेंट, विटामिन, कैल्शियम, मिनरल्स असे घटक असतात जे आपल्या शरीरातील आवश्यक असतात. तसेच थंडीच्या दिवसात आपल्या शरीरातील मखाणा खाल्याने एक ऊर्जा मिळते आणि त्यामुळे आपले शरीर येणाऱ्या आजारांपासून सुरक्षित राहते.

Please follow and like us:

Related Articles

Leave a Comment

Shares
error: तुम्ही कंटेंट कॉपी करू शकत नाही अन्यथा कायदेशीर कारवाई होईल