मित्रानो पाण्याला रंग चव आणि वासही नसते पण तरीही ही आपल्या शरीरासाठी आवश्यक अशी गोष्ट आहे. पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७१% इतके असूनही ते पिण्यासारखे नाही. समुद्रात पाणी सुमारे ९६.५% आहे. तर यातील पिण्यायोग्य पाणी फक्त 3% इतकेच या धर्तीवर आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा यांसारख्या मोहिमा आपण नेहमी पाहतो. पण पाणी पिताना कधी प्यायचे आणि कधी नाही प्यायचे यावरही अजुन ठाम मत ठरलेले नाही. खरतर माझ्यामते ठाम मत असावेच का जेव्हा आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता असेल तेव्हा आपल्याला पाणी प्यायला हवे.
काही जण म्हणतात जेवणाच्या एक तास अगोदर आणि जेवणानंतर एक तास नंतर पाणी प्यावे. हे उदाहरण आपल्यातील तरी किती जण पाळतात हे मला कमेंट करून सांगा. आता जेवताना कधी कधी आपल्याला ठसका लागतो, उचकी लागते कधी तिखट जास्त लागते त्यामुळे पाणी पिणे ही तेव्हा आपली गरज असते आणि खरंच आहे जेव्हा आपल्याला गरज असते ना तेव्हा पाणी पिणे कधीही चांगले असते.
मी तरी जेवल्यावर एक तास भर पाणी पिल्यावाचून अजिबात राहू शकत नाही मुळात ते मला जमणार नाही. काही लोकांना खरच अन्न पचायला जड जात असेल त्यांची पचनसंस्था बिघडली असेल अशा व्यक्तींनी कोमट पाणी पिणे उत्तम. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे जेवणासोबत पाणी पिण्याने अन्न व्यवस्थित पचायला लागते. यापुढे जाऊन जर व्यक्तीला आपले वाढलेले वजन कमी करायचे असेल तर त्याने अर्धा तास अगोदर पाणी पिने गरजेचे आहे. शिवाय व्यक्तीचे वजन वाढत नसेल तरी व्यक्तीने जेवणानंतर एक तास पाणी पिणे.